UGC NET 2021 May Exam Postponed: यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती

UGC NET 2021 May Exam Postponed:यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर टाकल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

UGC NET 2021 May Exam Postponed: यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती
UGC NET वेबसाईट फोटो
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 4:07 PM

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील लांबणीवर टाकली गेली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे.  कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 15 दिवस अभ्यासाला वेळ मिळेल अशा पद्धतीनं तारीख जाहीर केली जाईल, असं पोखरियाल म्हणाले. ( UGC NET 2021 May exam postponed due to corona virus outbreak said by Ramesh Pokhariyal Nishank)

रमेश पोखरियाल निशंक यांची घोषणा

UGC NET Exam काय आहे?

देशभरातील विद्यापीठ तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ संशोधक छात्रवृत्ती (Junior Research Fellowship) आणि सहाय्यक प्राध्यापक (Asisstant Professor) पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (UGC) नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्टचे (NET) आयोजन केले जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. मात्र, 2020 साली कोरोना महामारीमुळे या परीक्षांचे आयोजन लांबले होते.

परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी

नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. 2 मे ते17 मे दरम्यान नेटची परीक्षा होणार होती. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्रासह देशातील विद्यार्थ्यांनी केली होती.

संबंधित बातम्या: 

UGC NET 2021: नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती

UGC NET 2021: नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

UGC NET 2021 Postpone : सीबीएसई, नीट पाठोपाठ नेटची परीक्षा लांबणीवर टाका, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मागणी

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.