Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UGC NET 2021: नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या यूजीसी नेट परीक्षा 2021 (UGC NET 2021) परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवसा आहे. (ugc net exam form filling)

UGC NET 2021: नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती
UGC NET वेबसाईट फोटो
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 9:14 AM

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या यूजीसी नेट 2021 (UGC NET 2021) परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवसा आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन यूजीसीतर्फे करण्यात आले आहे. ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी फिस भरण्याची शेवटची तारीख 3 मार्च आहे. (UGC net exam last date of form filling is 3 march)

मे महिन्यात परीक्षा

UGC NET 2021 परीक्षा देण्यासाठी आधी अर्ज करावा लागेल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे. तसेच, केलेल्या अर्जामध्ये सुधारणा करायची असेल तर 5 ते 9 मार्चपर्यंत वेळ दिलेला आहे. या कालवाधीत उमेदवाराच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास दुरुस्ती करता येईल. त्यानंतर अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. यूजीसी नेट परीक्षा (UGC NET 2021) मे महिन्यातील 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 तारखेला आयोजित केली जाणार आहे. तसेच डिसेंबर 2020 महिन्यातील यूजीसी नेटची परीक्षा कोरोनामुळे लांबली होती. ती आता 2021 च्या मे महिन्यात घेतली जाईल.

UGC NET Exam काय आहे?

देशभरातील विद्यापीठ तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (UGC) नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्टचे (NET) आयोजन केले जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. मात्र, 2020 साली कोरोना महामारीमुळे या परीक्षांचे आयोजन लांबले.

अर्ज कसा कराल?

UCG NET ची परीक्षा द्यायची असेल तर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ugcnet.nta.ac.in या वेबसाईटवर जाऊन New Registration या ऑप्शनवर क्लिक करुन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. यावेळी मोबाईल नंबर आणि ईमेलच्या मदतीने रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग यूजीसी नेटची परीक्षा देण्यासाठी अर्ज करता येईल. हा अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे. आर्थिक मागास प्रवर्गासाठी 500 रुपये तर मागासवर्गीय आणि त्रितीयपंथी उमेदवारांसाठी 250 रुपये परीक्षा शुल्क असेल.

इतर बातम्या :

Government Job: उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; पगार 1 लाख रुपये

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.