Video : उमा भारती यांच्या भाच्याने चक्क तलवारीने कापले तब्बल 41 केक!
उमा भारती यांचा भाचा पुन्हा एकदा चर्चेत! 41 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन वादात, पाहा व्हिडीओ
मध्य प्रदेश : उमा भारती यांच्या भाच्याचा बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमुळे उमा भारती यांचा भाचा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आपल्या 41व्या वाढदिवसाला उमा भारती यांचा भाचा राहुल सिंह लोधी यांनी तब्बल 41 केप चक्क तलवारीने कापले. केक कापतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात अपलोड झाल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. टीकमगड जिल्ह्यातील खरगापूर इथं वाढदिवस साजरा करताना राहुल लोधी यांनी केलेली ही कृती आता विरोधकांच्या निशाण्यावर आलीय.
उमा भारती यांचा भाचा आणि भाजप आमदार असलेले राहुल लोधी यांनी आपल्या आठ वर्षांच्या मुलासोबत स्टेजवर चक्क तलवारीने केक कापला. या दरम्यान त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.
पाहा व्हिडीओ :
यह BJP विधायक और फायर ब्रांड नेता उमा भारती के भातेजी राहुल लोधी है।
कल इनका जन्मदिन था जिसे इन्होंने तलवार से 41 केक काट कर मनाया।
आज मध्य प्रदेश हाई कोर्ट ने इनकी विधायकी शून्य कर दी।
कोर्ट ने कहा निर्वाचन अधिकारी ने प्रक्रिया के विपरीत लोधी का नामांकन पत्र मंजूर किया।
2/1 pic.twitter.com/cvzhi1eyFh
— काश/if Kakvi (@KashifKakvi) December 7, 2022
मंगळवारी राहुल सिंह लोधी यांचा वाढदिवस होता. त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी स्टेजवरच तलवारीने 41 केक कापल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. यावर काँग्रेसने टीका करत भाजपच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत.
मध्य प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अजय यादव यांनी राहुल सिंग लोधी यांच्या बर्थडे सेलिब्रेशनवर निशाणा साधला. खरगापूर येथील लोक महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारासारख्या समस्यांनी त्रस्त आहेत आणि भाजप आमदार तलवारीने केक कापून लोकांना भीती घालण्याचा प्रयत्न करतेय, असं ते म्हणाले.
याआधीही उमा भारती यांचा भाचा आणि भाजप आमदार राहुल सिंह लोधी हे चर्चेत आले होते. एका माजी काँग्रेस आमदाराच्या आरोपांनंतर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप लोधी यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचं विधानसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.
कायद्याने शस्त्रांचं गैरवापर करणं,किंवा शस्त्रांस्त्रांच्या मदतीने चुकीच्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करण्यावर बंदी आहे. या बंदीचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता राहुल सिंह लोधी यांच्यावर तलवारीने केक कापल्यामुळे कायदेशीर कारवाई होणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.