ISISच्या 2 हजार दहशतवाद्यांचा भारतावर हल्ल्याचा कट! UNच्या रिपोर्टचा दावा

इस्लामिक स्टेट आणि त्याची सहकारी संघटना खोरासनचा नवा म्होरक्या शिहब अल मुजाहिर यांनी मिळून भारतासह आशियातील अनेक देशांत हल्ला करण्याचा कट रचत आहेत.

ISISच्या 2 हजार दहशतवाद्यांचा भारतावर हल्ल्याचा कट! UNच्या रिपोर्टचा दावा
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 10:47 PM

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना ISIS भारतावर हल्ल्याचा कट रचत आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार इराकमधील इस्लामिक स्टेट आणि त्याची सहकारी संघटना खोरासनचा नवा म्होरक्या शिहब अल मुजाहिर यांनी मिळून भारतासह आशियातील अनेक देशांत हल्ला करण्याचा कट रचत आहेत. या दहशतवादी संघटना भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंकेत हल्ल्याची योजना आखत आहेत. चिंताजनक बाब ही की दहशतवादी संघटनेला हक्कानी नेटवर्कचीही साथ मिळाली आहे. हक्कानी नेटवर्क पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी ISIच्या इशाऱ्यावर काम करते.(UN reports that ISIS is planning to attack India)

संयुक्त राष्ट्राचे महासचिव एन्टोनिया गुटेरेसने स्वत: या रिपोर्टबाबत माहिती दिली आहे. महासचिवांच्या 12व्या रिपोर्टमध्ये ISIमुळे आंतरराष्ट्रीय शांततेला धोका निर्माण होत असल्याचं म्हटलंय. ISIचे 1 ते 2 हजार दहशतवादी पूर्ण अफगाणिस्तानात पसरले आहेत. ही दहशतवादी संघटनेनं जगभरात अनेक हल्ले केले आहेत. या संघटनेनं नोव्हेंबरमध्ये काबुल विद्यापीठावरही हल्ला केला होता.

संपूर्ण आशियात पसरण्याची तयारी

संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार ISIL-Kच्या जवळही 1 हजार ते 2 हजार 200 दहशतवादी आहेत. हे दहशतवादी अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये पसरले आहेत. शिहब अल मुहाजिरला जून 2020 मध्ये संघटनेचा नवा म्होरक्या म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान, भारत आणि बांग्लादेशसह अन्य आशियाई देशांत तो हल्ला करु इच्छित आहे. हाती आलेल्या माहितीनुसार त्याने हल्ल्याचा कट पूर्णत्वास नेण्यासाठी हक्कानी नेटवर्कसोबतही हाथ मिळवणी केली आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISIचं बाहुलं

हक्कानी नेटवर्क पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI सोबत मिळालेली आहे. पाकिस्तान गुप्तचर संघटनेच्या इशाऱ्यावरच ही दहशतवादी संघटना अफगाणीस्तानमध्ये दहशतवाद पसरवत आहे. पाकिस्तानच्या उत्तरी वजिरिस्तानमध्ये ही दहशतवादी संघटना आरामात आपलं काम करत आहे आणि याला पाकिस्तान सरकारचा वरदहस्त आहे. अफगाणिस्तानातील अनेक हल्ल्यांमागे या दहशतवादी संघटनेचा हात आहे.

ऑनलाईन भरती सुरु

रिपोर्टद्वारे मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आशियात आपली मुळं तपासण्यासाठी ISIS ने भरती सुरु केली आहे. त्यासाठी ऑनलाईन मंचावर एक प्रोपोगँडा पसरवून लोकांचा शोध घेत आहे. मालदीव आणि श्रीलंकामध्ये खासकरुन ही मोहीम जोरदार सुरु आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिवाने सांगितलं आहे की, दहशतवादी संघटना महामारीचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानच्या फरार दहशतवाद्यावर अमेरिकेकडून 21 कोटींचं इनाम, अफगाणिस्तानात असा झाला शेवट

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता, देशभरात हायअलर्ट

UN reports that ISIS is planning to attack India

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.