पुतणीच्या लग्नात पंजाबी गाण्यावर ठेका धरला, नाचता नाचताच स्टेजवर कोसळला अन् लग्नमंडपात स्मशानशांतता पसरली !

भाचीच्या लग्नात मामाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. लग्नाच्या स्टेजवरच मामाने पंजाबी गाण्यावर ठेका धरला होता. पण हा आनंद अधिक काळ टिकू शकला नाही.

पुतणीच्या लग्नात पंजाबी गाण्यावर ठेका धरला, नाचता नाचताच स्टेजवर कोसळला अन् लग्नमंडपात स्मशानशांतता पसरली !
लग्नात नाचताना हृदयविकाराचा झटका
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 11:46 PM

भिलाई : सध्या सगळीकडेच लग्नसराई सुरु आहे. या धामधुमीत आनंदाचे वातावरण असताना छत्तीसगडच्या भिलाई जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदापुढे आकाश ठेंगणे झाल्याच्या जोशात बेभान होऊन नाचता नाचता व्यक्ती खाली कोसळला अन् पुन्हा उठलाच नाही. मृत व्यक्ती आपल्या पुतणीच्या लग्नात डान्स करीत होता. याचदरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला. दिलीप दल्ली असे 52 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून, ते राजहरा येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात सहायक अभियंता म्हणून कार्यरत होते. ऐन लग्नसोहळ्यात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

भिलाई येथे ज्या ठिकाणी लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता, तेथे सर्वच जण मोठ्या उत्साहाने नाचत होते. दिलीप दल्ली यांना पुतणीच्या लग्नाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. लाडक्या पुतणीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ते बेभान होऊन नाचत होते. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते स्टेजवरच खाली कोसळले. हा सर्व वेदनादायी प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

दिलीप पंजाबी गाण्यांवर जबरदस्त डान्स करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्यासोबत वधू-वरानेही ठेका धरला होता. दिलीप हे ज्या उत्साहात नाचत होते, त्या उत्साहाला अचानक अनुचित घटनेचे गालबोट लागेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाला मृत्यू

दिलीप हे बराच वेळ बेभान होऊन डान्स करीत होते. त्यात त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते काही वेळ खाली बसले. मात्र छातीत वेदना होत असल्याचे कुणाला सांगण्याआधीच ते स्टेजवर कोसळले. इतर मंडळींनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले होते. मात्र तेथे उपचार सुरु करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....