Amit Shah: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त
अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांनी भगवान शंकराप्रमाणे आपल्यावर झालेले आरोपांचे विष पचवले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, काँग्रेस हा घराणेशाहीतील पक्ष आहे, त्यामुळे त्यामधील अनेक सदस्य हे पक्षांतर्गतच लोकशाहीसाठी लढत असल्याचा दावाही गृहमंत्र्यांकडून करण्यात आला आहे
नवी दिल्लीः भारतात पुढील 30 ते 40 वर्षे हा भाजपचाच कार्यकाळ असणार आहे, आणि या काळात भारत विश्वगुरू (India Vishwaguru) नक्की बनणार असल्याचा विश्वास गृहमंत्री अमित शहा (BJP Leader Amit Shah) यांनी व्यक्त केला. घराणेशाही, जातिवाद हा देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप असून तोच देशाच्या अधोगतीला कारणीभूत असल्याची टीकाही अमित शहा यांनी केली. हैदराबादमध्ये भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (national executive meeting) सुरू आहे, त्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी सांगितले की, भारतातील यापुढील 30 ते 40 वर्षाचा काळ हा भाजपचा असणार आहे, आणि या काळात भारत विश्वगुरू बनणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी यावेळी त्यांनी भारतातील राजकारणावर बोलताना सांगितले की, घराणेशाही, जातियवाद आणि अशांतता हा आपल्या देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच देशात वाईट काळाला सामोरे जावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.
पारंपरिक राजकीय घरण्यांची सत्ता संपुष्ठात
तेलंगणा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यातील पारंपरिक राजकीय घरण्यांची सत्ता भाजपकडूनच संपुष्ठात आणली जाईल. आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासह इतर राज्यांमध्येही भाजप एकहाती सत्तेवर येईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. देशात 2014 पासून भाजप केंद्रात सत्तेत असले तरी या राज्यांमधून भाजप सत्तेबाहेर आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक
दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अमित शहा यांनी स्वागत करून तो ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले. गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह 64 जणांना एसआयटीकडून क्लीनचिट देण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी यांनी भगवान शंकराप्रमाणे आरोपांचे विष पचवले
यावेळी अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांनी भगवान शंकराप्रमाणे आपल्यावर झालेले आरोपांचे विष पचवले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, काँग्रेस हा घराणेशाहीतील पक्ष आहे, त्यामुळे त्यामधील अनेक सदस्य हे पक्षांतर्गतच लोकशाहीसाठी लढत असल्याचा दावाही गृहमंत्र्यांकडून करण्यात आला आहे. गांधी घराणे पक्षावरील नियंत्रण गमावण्याची भीती असल्याने अंतर्गत संघटनात्मक निवडणुका होऊ देत नाही. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले की, विरोधक अतृप्त आहेत, त्यामुळे सरकारकडून चांगले काम करण्यात आले तरी त्यांच्याकडून विरोध करण्यात येत आहे.