Amit Shah : ‘देशाच्या दौऱ्यावर’ गृहमंत्री अमित शाह; येत्या 3 आठवड्यात भेट देणार 7 राज्यांना, होणार 2024 ची रणनीती तयार!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील तीन आठवड्यांत सात राज्यांच्या दौऱ्यावर आहेत
नवी दिल्ली : देशात भोंग्याचे राजकारण, बुल्डोजर मॉडेलवर घमासान सुरू आहे. तर नव्यानेच कोरोनाने (Corona) आपले डोके वर काढले आहे. चीनमध्ये अनेक शहरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. तर देशातही कोरोनाचे रूग्न वाढत आहेत. त्यातच अवघ्या दोन वर्षांवर निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे. त्याच अनुशंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) पुढील तीन आठवड्यांत सात राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. तर त्यांच्या सात राज्यांच्या दौऱ्याकडे देशाचा दौरा म्हणून पाहिले जात आहे. या दौऱ्यात ते सार्वजनिक, राजकीय आणि अधिकृत कार्यक्रमात भाग घेणार आहेत. शाह सध्या पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, गृहमंत्री पश्चिम बंगाल, आसाम, तेलंगणा, केरळ, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातचा दौरा करतील.
पक्षाचे कॅडर बळकट करण्याच्या प्रयत्न
गृहमंत्री अमित शाह हे 9 आणि 10 मे रोजी आसामच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यादरम्यान, ते राज्यातील हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. यानंतर केंद्रीय गृहमंत्री 14 मे रोजी तेलंगणाला जातील, जिथे ते रंगा रेड्डी जिल्ह्यात रॅलीला संबोधित करतील. त्याचवेळी, 15 मे रोजी शाह केरळला जाणार आहेत. यादरम्यान ते भाजपच्या सभांमध्ये भाग घेऊ शकतात. तसेच पक्षाच्या नेत्यांच्या बैठकाही घेऊ शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे कॅडर बळकट करण्याच्या प्रयत्नात या बैठका घेतल्या जातील.
अनेक कार्यक्रम आणि सभांमध्ये भाग
शाह 20 मे रोजी उत्तराखंडचा एक दिवसीय दौरा करणार आहेत. येथे ते अधिकृत आणि पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तसेच शाह अनेक अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी दोन दिवस (21-22 मे) अरुणाचल प्रदेशला देखील भेट देतील. तर 27 मे रोजी गृहमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील. 28 ते 29 मे दरम्यान ते गुजरातला भेट देणार आहेत. दोन्ही राज्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अनेक अधिकृत आणि पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
बंगालमध्ये बीएसएफच्या तरंगत्या सीमा चौक्यांचे उद्घाटन
गृहमंत्री सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. जिथे त्यांनी गुरुवारी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सुंदरबन भागातील हिंगलगंज येथे फ्लोटिंग बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) सीमा चौक्यांचे आणि एका जहाज रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले. 20121 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शाह प्रथमच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले, “घुसखोरी आणि तस्करी रोखणे अवघड आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याशिवाय, परंतु लवकरच अशी राजकीय परिस्थिती उद्भवेल ज्यामध्ये जनतेच्या दबावामुळे तुम्हाला ते सहकार्य मिळेल. “मी आणीन.’ गृहमंत्र्यांनी देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या भूमिकेचे कौतुक केले. घुसखोरी आणि तस्करीपासून आपल्या सीमांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.