नवी दिल्लीः केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह (Union Energy Minister R.K. Lion) हे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले असताता. त्यांनी सध्या बिहारमधील आरा जिल्ह्यातील महापौर (Mayor) आणि नगरसेवक (Councillors) यांच्याबद्दल केलेले वक्तव्य जोरदार चर्चेत आले आहे. आराहमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, या भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे येथील अशा चोर आणि दरोडेखोर असणाऱ्या महापौर, नगरसेवकांना तुम्ही का निवडून देता? ही लोकं नागरिकांची काही कामं करत नाहीत. त्यामुळे यांना काठीने झोडून काढूनच सरळ केले पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
यावरच ते न थांबता म्हणाले की, म्हणून मी अशा या भ्रष्ट नेत्यांना चप्पलाच्याच जागी ठेवतो. त्यामुळे तुम्ही मला मत द्या आगर देऊ नका पण मी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आराह जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेले असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आराह जिल्ह्यातील विविध कामांचे उद्घाटन करण्यासाठी गेले असताना त्यांनी तेथील खराब रस्त्यांची पाहणी केली.
त्यानंतर त्या रस्तांची त्यांनी खिल्ली उडवत सांगितले की, मी खासदार असताना जेवढी या परिसरातील कामं केली आहेत. तेवढी इतर कोणत्याही नेत्यांनी माझ्यासारखी कामं केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
माझ्या कार्यकाळात केलेली कामं ही हातात काठी घेऊनच मी ती करुन घेतली आहेत. त्यामुळे माझ्याआधीही आणि मी पदावरुन गेल्यानंतरही अशा प्रकारची कामं होणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेच्या कामावर बोट ठेवत त्यांनी महापौर आणि नगरसेवकांवर जोरदार हल्लाबोल केला. रस्त्याच्या दुर्दशा झाल्या असून याकेड कुणीच का लक्ष देत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
येथे रस्ते खराब अनेक समस्या असल्या तरी त्याची चिंता महापालिका करणार नाही. त्यामुळे तुम्ही लोकं चार चार नगरसेवक का निवडून देता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महापालिकेतील नगरसेवक हे चोर आहेत तर महापौर म्हणजे मोठा दरडोखोर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. विकासाच्या बाबतीत आमदारांव आम्ही नेहमीच लक्ष ठेऊन असतो, तरीही आमदार लोकं काय करतात, त्यांना काठीने झोडून काढा, गोळ्या घाला पण कामं करुन घ्या असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले आहे.