मोदी सरकार देतय, दर महिन्याला ‘इतक्या’ लाख नोकऱ्या, रोजगाराची चिंताही मिठणार…
भारतातील तरुणांना रोजगारा चिंता आहे, त्यामुळे या गोष्टीचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांना एकच गोष्ट, एकच मंत्र आठवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही.
नवी दिल्लीः भारतात सध्या केंद्र सरकारकडून दर महिन्याला सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण करण्यात येत असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्रीय राखीव पोलीस दलाने अजमेरमध्ये आयोजित केलेल्या ‘रोजगार मेळाव्या’ च्या कार्यक्रमप्रसंगी वैष्णव बोलत होते. वैष्णव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘या सरकारमध्ये दरमहा सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत आणि पारदर्शकता हीच या मोदी सरकारची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
जगभरातील आर्थिक संकटाच्या परिस्थितीतही भारत हा ऊर्जास्रोत म्हणूनच सगळ्यांसमोर उदयास आला असल्याचे सांगण्यात आले. नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट हा मंत्र तरुणांना अंगीकारण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, जीवनात तेच लोक जिंकतात ज्यांनी आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले असं त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
आता भारतातील तरुणांना रोजगारा चिंता आहे, त्यामुळे या गोष्टीचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांना एकच गोष्ट, एकच मंत्र आठवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही.
राष्ट्र प्रथम आणि ते नेहमीच प्रथम हा मंत्र असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जीवनाच्या विविध क्षेत्रांतून अनेक उदाहरणे घेता येतील, परंतु केवळ तेच लोक पुढे गेले, त्यांनाच समाधान आणि विजय मिळाला ज्यांनी आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 हून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.