या गावातील दिवाळीची परंपराच वेगळी, दिवाळी सण आहे की युद्धाचं मैदान
भारतातील अनेक जाती आणि धर्म, पंथाचे लोक त्यांचे सण आणि परंपरा हजारो वर्षे साजरे करीत आले आहेत. तुम्ही दिवाळी कधीच साजरी न करणारे हिमाचलचे शापित गावाबद्दल वाचले असेलच आता आणखी एका गाव दिवाळीत अक्षरश: रणभूमी बनलेले असते.
आपला देश निरनिराळ्या परंपराचं संगम आहे. विविध चालीरिती आणि धर्म, पंथाचे येथे विविध सण आनंदाने साजरे केले जातात. अशीच एक अनोखी दिवाळी साजरी करण्याची रित बुंदेलखंड येथे द्वापार युगापासून सुरु आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण येथील महोबा गाव जणू रणसंग्राम बनते. येथे जागोजागी लोक हातात लाठ्या- काठ्या घेऊन दिवाळीचा सण खेळायला जमतात. एवढेच नव्हे तर गावात दिवाळीला लोकनृत्य तसेच एकता आणि हिंदु आणि मुस्लीम बंधुभावाचे दर्शनही होते.
ढोलाच्या तालावर युवक लाठ्यांचे अचूक वार करीत तरुणांच्या टोळ्या युद्ध कलेचे अनोखे प्रदर्शन साजरे करत लोकांना आश्चर्यचकीत करतात. केवळ तरुण आणि वयस्क मंडळीच लाठ्यांची ही युद्धकला सादर करीत नाहीत तर लहान – लहान मुले येथे आत्मसंरक्षणाचे धडे जन्मापासून शिकत असतात. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात वसलेल्या बुंदेलखंड येथील शूरता आणि बहादूरी दाखविणारी दिवाळीची परंपरा विशेष महत्वाची आहे.लाल, हिरव्या, निळ्या,पिवळ्या वेशभूषेत लोक मजबूत लाठी जेव्हा हातात घेतात. बुंदेली परंपरा आणि संस्कृती या अनोख्या दिवाळी साजरी करण्याच्या परंपरेतून दिसत असते.
दिवाळीच्या आधी आठवडे हा सण सुरु होतो ते दिवाळीपर्यंत सुरु राहातो. गल्ली-गल्लीतील धार्मिक स्थानांवर पूजा झाल्यानंतर लाठ्या हातात घेऊन टोळकी एकमेकांशी ढोलाच्या थापेवर युद्ध करु लागते. दिवाळीतील नृत्यामुळे तरुणांना आत्मसंरक्षण कसे करायचे ते समजते. दिवाळी नृत्य करणाऱ्या टोळीचा प्रमुख दिवाळी गाऊन अन्य सदस्यांमध्ये जोश आणि उत्साह तयार करीत असतो.
लठमार होळी तशी दिवाळी
दिवाळी गाऊन साजरी करताना लोक लाठी काठीने एकमेकांवर हल्ले सुरु करतात. त्यामुळे ते दिवाळी साजरी करत आहेत की युद्ध करीत आहेत. हे समजत नाही. जसे काही युद्धाचे मैदान काबिज करण्यासाठी हे लाठीकाठी युद्ध सुरु आहे. बुंदेलखंड येथील महोबा, हमीरपुर, बांदा, चित्रकुट, झांशी, ललितपुर आणि जालौन येथील रस्त्यांवर तुम्हाला लठमार दिवाली पाहायला मिळू शकते. बरसाना येथील लठमार होळीच्या सारखी ही बुंदेलखंड येथील लठमार दिवाळी आपली क्षेत्रीय भाषा आणि वेशभूषा, परंपरा सादर करीत आली आहे.