Nirmala Sitharaman | शेती संबंधित उद्योगांसाठी 1 लाख कोटींची तरतूद : अर्थमंत्री

शेतकऱ्यांची लुबाडणूक थांबवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यात सुधारणा करणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

Nirmala Sitharaman | शेती संबंधित उद्योगांसाठी 1 लाख कोटींची तरतूद : अर्थमंत्री
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 5:32 PM

Union Finance Minister Nirmala Sitharaman : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (FM Nirmala Sitharaman) यांनी 20 लाख कोटी रुपयाचं ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी तीन भागांमध्ये पत्रकार परिषद घेत या पॅकेजमध्ये कुठल्या क्षेत्राला काय मिळणार याबाबत सविस्तर माहिती दिली. आज झालेली पत्रकार परिषद ही शेती आणि शेती संबंधित व्यवसाय केंद्रीत होती. यावेळी शेती संबंधित उद्योग धंद्यांना तब्बल 1 लाख कोटीचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच, भोळ्या शेतकऱ्यांची लुबाडणूक थांबवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यात सुधारणा करणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

शेती आणि शेतीपुरक व्यवसायांना आधार देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी 8 महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी कृषी आणि कृषी निगडित क्षेत्राला 1 लाख कोटी, फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10 हजार कोटी, मत्स्यसंपदा योजनेसाठी 20 हजार कोटी, पाळीव प्राणी लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी, दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

तसचे, लॉकडाऊन दरम्यान 74,300 कोटींपेक्षा जास्त किंमतीची किमान आधारभूत खरेदी करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,400 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली.

FM Nirmala Sitharaman LIVE Updates 

  • जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यात सुधारणा करणार, जीवनावश्यक वस्तुंवरील सरकारी नियंत्रण हटवले, दाळी, खाद्यतेले, कांद्यावरचे नियंत्रण हटवले, शेतक-यांना माल विकण्यासाठी पर्याय देणार, शेतकऱ्यांना परराज्यातही माल विकता येणार : अर्थमंत्री
  • सरकारकडून शेतकर्‍यांना चांगल्या किंमती मिळवून देण्यासाठी आवश्यक वस्तू कायद्यात (Essential Commodities Act) सुधारणा; धान्य, खाद्यतेल, तेलबिया, डाळी, कांदे आणि बटाटे यांच्यासह कृषी उत्पादने नियंत्रणमुक्त : अर्थमंत्री
  • ऑपरेशन ग्रीन नावाने 500 कोटींची योजना, 6 महिने वाहतुकीसाठी 50% सबसिडी : अर्थमंत्री
  • कृषीपुरवठा साखळीसाठी अतिरीक्त 500 कोटी, मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपये, 2 लाख मधुमक्षिकापालकांना याचा लाभ होईल : अर्थमंत्रीLIVETV | भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’, भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी 50 टक्के अनुदान : निर्मला सीतारमण लाईव्ह https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/otAey83lnB— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020
  • भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’, भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी 50 टक्के अनुदान : अर्थमंत्री
  • मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपये, 2 लाख मधुमक्षिकापालकांना लाभ होईल : अर्थमंत्री
  • वनौषधींसाठी 4 हजार कोटी रुपयांची मदत, वनौषधींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादन 5 हजार कोटीने वाढेल, 10 लाख हेक्टर क्षेत्रावर वनौषधी घेणार : अर्थमंत्री
  • दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी रुपये : अर्थमंत्री
  • 53 कोटी पशुधनासाठी लसीकरण, 13 हजार 343 कोटी रुपयांची तरतूद :अर्थमंत्री
  • LIVETV | 53 कोटी पशुधनासाठी लसीकरण, 13 हजार 343 कोटी रुपयांची तरतूद : निर्मला सीतारमण लाईव्ह https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/GUlKVu73Fm

    — TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020

  • शेतकर्‍यांना तातडीने एक लाख कोटी रुपयांचा कृषी-पायाभूत सुविधा निधी तयार करावा : अर्थमंत्री
  • फूड एन्टरप्राइजेससाठी 10 हजार कोटी रुपये देण्यात येणार, याचा फायदा 2 लाख छोट्या फूट एन्टरप्राइजर्सला मिळणार : अर्थमंत्री
  • लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांनी खरेदी न केल्याने दूध रस्त्यावर फेकले जात होते, या काळात 560 लाख लिटर दूध प्रतिदिवस खरेदी केले गेले, शेतकऱ्यांना 4,100 कोटी मिळाले : अर्थमंत्री
  • 1 लाख कोटी शेतीशी निगडीत उद्योग धंद्याला देण्यात येणार, यामुळे अॅग्रीगेटर, FPOs, कोल्डचेनला पैसा मिळेल. तसेच स्टोरेज, यार्ड उभारणीसाठी पैसा मिळेल : अर्थमंत्री
  • LIVE : 1 लाख कोटी शेतीशी निगडीत उद्योग धंद्याला देण्यात येणार https://t.co/geObg8OTjv #NirmalaSitharaman pic.twitter.com/a8jFLzUcOM

    — TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020

  • लॉकडाऊन कालावधीत दुधाची मागणी 20-25% कमी झाली. सन 2020-21 मध्ये दुग्ध सहकारी संस्थांना वार्षिक 2% दराने व्याज सवलती देण्याची नवीन योजना. यामुळे 2 कोटी शेतकऱ्यांना 5000 कोटी रुपयांची अतिरिक्त लिक्विडीटी : अर्थमंत्री

    LIVETV | लॉकडाऊन कालावधीत दुधाची मागणी 20-25% कमी झाली. सन 2020-21 मध्ये दुग्ध सहकारी संस्थांना वार्षिक 2% दराने व्याज सवलती देण्याची नवीन योजना. यामुळे 2 कोटी शेतकऱ्यांना 5000 कोटी रुपयांची अतिरिक्त लिक्विडीटी : निर्मला सीतारमण लाईव्ह https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/dsWLvop4fJ

    — TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020

  • लॉकडाऊन दरम्यान, 74,300 कोटींपेक्षा जास्त किंमतीची किमान आधारभूत खरेदी, पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,400 कोटी रुपये : अर्थमंत्री
  • गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांसाठी अनेक पावलं उचलण्यात आली : अर्थमंत्री
  • लॉकडाऊनदरम्यान 74 हजार 300 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले, यातील 18700 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले : अर्थमंत्री
  • भारत सर्वात मोठा दूध उत्पादक, सर्वात मोठा ज्यूट व डाळी उत्पादक देश आहे. ऊस, कापूस, भुईमूग, फळे, भाज्या व मत्स्यपालनात तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय शेतकर्‍याने खरोखर धीर धरला आहे : अर्थमंत्री
  • केंद्रीय अर्थमंत्रालयाची पत्रकार परिषद, आज 11 घोषणा करणार, शेतकऱ्यांसंबंधित 8 तर प्रशासन संबंधित 3 घोषणा
  • अर्थमंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी पॅकेज जाहीर होणार
  • मत्स्यपालनासह शेती आणि त्यासंबंधित कामे करणाऱ्या व्यक्तींसाठी आज पॅकेज : अर्थमंत्री
  • LIVE : केंद्रीय अर्थमंत्रालयाची पत्रकार परिषद सुरु https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/A80EXX1MT2

    — TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020

20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज

कोरोना संकंटाचा सामना करताना नव्या संकल्पानुसार पंतप्रधान मोदी यांनी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारताचा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. हे पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं असेल, असे मोदींनी सांगितलं.

नुकतंच सरकारने कोरोना संकंटाशी संबंधित ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या. जे रिझर्व्ह बँकेचे निर्णय होते आणि आज ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा होत आहे त्याला जोडलं तर हे पॅकेज जवळपास 20 लाख कोटींचं पॅकेज आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीचं जवळपास 10 टक्के एवढे आहे. देशाच्या विविध वर्गांना यामार्फत आर्थिक सहकार्य मिळेल. 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये स्वावलंबी भारतच्या अभियानाला एक वेगळी गती देईल. स्वावलंबी भारतच्या संकल्पाला सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. हे पॅकेज कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग अशा अनेकांसाठी आहे.

देशातील नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी आणि श्रमिक मजुरांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. हे आर्थिक पॅकेज प्रामाणिकपणे टॅक्स भरुन देशाच्या विकासात आपलं योगदान देणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी आहे. गेल्या सहा महिन्यात व्यवस्था सक्षम झाली. त्यामुळेच भारताच्या प्रत्येक (FM Nirmala Sitharaman) गरिबापर्यंत केंद्र सरकारची आर्थिक मदत पोहोचली.

संबंधित बातम्या :

Aatm Nirbhar Bharat : 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये कुठल्या क्षेत्राला काय मिळणार?

Economic Package | सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटींचे विना हमी कर्ज, गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ

One Nation One Ration | काय आहे ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना?

Nirmala Sitharaman | स्थलांतरित मजूर, शेतकरी ते फेरीवाले, निर्मला सीतारमण यांच्या कोणासाठी कोणत्या घोषणा?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.