अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही : हायकोर्ट

'विरुद्धलिंगी अविवाहित जोडप्यांना अतिथी म्हणून हॉटेलच्या रुमचा ताबा घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नाही, असं मद्रास हायकोर्टाने निकालात स्पष्ट केलं

अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही : हायकोर्ट
Follow us
| Updated on: Dec 13, 2019 | 3:07 PM

चेन्नई : अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अविवाहित स्त्री-पुरुष युगुलाला रुम नाकारणाऱ्या हॉटेलांना दणका (Unmarried Couple in Hotel Room) मिळाला आहे.

‘विरुद्धलिंगी अविवाहित जोडप्यांना अतिथी म्हणून हॉटेलच्या रुमचा ताबा घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नाही. दोन सज्ञान व्यक्तींमधील लिव्ह इन रिलेशनशीप हे कायद्याच्या चौकटीत मोडत नाहीत. त्यामुळे अशा दोन सज्ञान अविवाहित जोडप्याने (महिला आणि पुरुष) हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा ठरु शकत नसल्याचं मद्रास हायकोर्टाने स्पष्ट केलं.

तामिळनाडूतील कोइम्बतूरमध्ये याचिकाकर्ता एक सर्व्हिस अपार्टमेंट चालवत होता. पीलामेदू पोलिस स्टेशनच्या पथकाने 25 जून रोजी अपार्टमेंट परिसरात छापेमारी केली. त्यावेळी एका खोलीत मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. या खोलीत एक सज्ञान महिला आणि पुरुष राहत होते, मात्र त्यांचा एकमेकांशी विवाह झालेला नव्हता. त्यानंतर संबंधित पथकाने कोणतीही नोटीस न देता परिसर सील केला. त्यामुळे याचिकाकर्त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला.

एपीएमसीची ‘रेकॉर्ड रुम’ उघडून जुगाराचा डाव, फोटो काढताना दोघे पळाले, गोपनीय फाईल रामभरोसे!

सर्व्हिस अपार्टमेंटला सील ठोकताना आपली बाजू ऐकून न घेतल्याचा दावा याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. सोशल मीडियावर वायरल झालेल्या बातमीचा आधार घेत कारवाई केल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला होता.

बूकिंग रजिस्टरमध्ये खोलीत राहणाऱ्या स्त्री-पुरुषाचा कोणताही तपशील नव्हता. त्यामुळे या खोलीत अवैध व्यवहार चालत असावेत, असं पीलामेदू पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना तहसीलदारांनी सांगितल्याचं सरकारतर्फे म्हटलं.

अविवाहित जोडप्याला खोली देणं हे अनैतिक असल्याचं कोर्टात सादर केलेल्या रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. परंतु अविवाहित जोडप्याला खोली दिल्याने कायद्याचं उल्लंघन कसं होतं, या कोर्टाच्या प्रश्नाचं उत्तर सरकारी पक्षाला (Unmarried Couple in Hotel Room) देता आलं नाही.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.