बांधकाम मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी 75 हजार, योगी सरकारची मोठी घोषणा
उत्तर प्रदेशातील कामगार किंवा श्रम विभाग बांधकाम मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी 'कन्या विवाह सहायता योजना' राबवतं. (Yogi Adityanath laborer's daughters wedding)

लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी सरकार नोंदणीकृत बांधकाम मजुरांना सुखद धक्का दिला आहे. कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी 75 हजार रुपये देण्याची घोषणा यूपीतील राज्य सरकारने केली आहे. या निर्णयामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य सचिव सुरेश चंद्र यांनी व्यक्त केला. (UP CM Yogi Adityanath Government gifts 75 thousand to building laborer’s daughters wedding)
उत्तर प्रदेशातील कामगार किंवा श्रम विभाग बांधकाम मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी ‘कन्या विवाह सहायता योजना’ राबवतं. या अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांचं आयोजन केलं जातं. योजनेच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जोडप्यांनी लग्नासाठी नाव नोंदणी केली आहे.
अटी आणि नियम
या योजनेत नोंदणीकृत बांधकाम कामगार, ज्यांची कामगार विभागात 100 दिवसांहून आधी नोंदणी झालेली आहे, ते 12 मार्चपर्यंत आपापल्या जिल्ह्यातील कामगार कार्यालयात अर्ज करू शकतात. लखनऊ, हरदोई, सीतापूर, रायबरेली, उन्नाव, लखिमपूर खीरी, बाराबंकी यासारख्या जिल्ह्यांतून प्रतिसाद मिळत आहे.
18 मार्चला सामूहिक विवाह
येत्या 18 मार्चला 3500 जोडप्यांचा विवाह करण्याचे योगी सरकारचे लक्ष्य आहे. रायबरेली रोडवरील वृंदावन योजनेत हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. कार्यक्रमात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहू शकतात.
मनसेचा सामूहिक विवाह सोहळा पुढे ढकलला
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आठशे जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. 26 फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी दररोज शंभर मनसे कार्यकर्ते रात्रंदिवस नियोजन करत होते. आठशे जोडप्यांना साडी, भांडी, बाशिंग यांचं वाटपही करण्यात आलं होतं. फक्त 26 फेब्रुवारीला जोडप्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार टाकणे, एवढा विधी होणे बाकी होते. परंतु राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत सोहळा पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले
संबंधित बातम्या :
राज आणि शर्मिला ठाकरेंच्या उपस्थितीचं नियोजन, आठशे जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुढे ढकलला
(UP CM Yogi Adityanath Government gifts 75 thousand to building laborer’s daughters wedding)