आधी फिल्म इंडस्ट्रीला आवताण, आता योगी थेट मुंबईत, उद्योगपती आणि सिनेसृष्टीशी चर्चेची वेळ ठरली

आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन फिल्म इंडस्ट्रीला उत्तर प्रदेशमध्ये येण्याचं आवताण दिलं होतं. आता ते मुंबईतील उद्योजकांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन करणार आहेत.

आधी फिल्म इंडस्ट्रीला आवताण, आता योगी थेट मुंबईत, उद्योगपती आणि सिनेसृष्टीशी चर्चेची वेळ ठरली
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 7:28 PM

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी आणि तेथे रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जोरदार प्रयत्न करत आहेत. यासाठी ते पुन्हा एकदा मुंबईचा दौरा करणार आहेत. याआधी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन फिल्म इंडस्ट्रीला उत्तर प्रदेशमध्ये येण्याचं आवताण दिलं होतं. आता ते मुंबईतील उद्योजकांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन करणार आहेत. ते दोन दिवस मुंबईत असणार आहेत (UP CM Yogi Adityanath on two day Mumbai tour will meet Businessman to appeal invest in UP).

योगी आदित्यनाथ मुंबईत लखनौ महानगरपालिकेच्या म्युनिसिपल बॉन्डचं बीएससीमध्ये लिस्टिंग करण्याच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी उद्योगपतींसोबत चर्चा करतील. योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येतील. 2 डिसेंबरला ते मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये लखनौ महानगरपालिकेच्या बॉन्डच्या ऑफिशियल लिस्टिंगमध्ये सहभागी होतील.

लखनौ महानगरपालिकेने याच महिन्यात 200 कोटीचा बॉन्ड जारी केला होता. याचंच आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत बीएससीमध्ये लिस्टिंग होईल. हा निर्णय लखनौ महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. लखनौच्या आधी देशातील इतर 10 महापालिकांनी देखील बॉन्ड जारी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2018 मध्ये गुंतवणूकदारांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी लखनौला आले असताना त्यांनी लखनौ आणि गाझियाबाद पालिका बॉन्ड जारी करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे या पालिका आपल्या बॉन्डला स्टॉक एक्सचेंजमध्ये समाविष्ट करतील. त्यानंतर अनेक मोठमोठ्या कंपन्या पालिकेच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करु शकतील. त्यामुळे लखनौला विकासासाठी निधी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आदित्यनाथ यांची उद्योगपतींसोबत बैठक

भाजप सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने 2018 मध्ये इन्वेस्टर्स फ्रेंडली हब म्हणून विकास होण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या होत्या. 2019 मध्ये देखील ग्राऊंड ब्रेकिंग सेरेमनी लखनौमध्येच झाली. 2020 मध्ये मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचं हे संमेलन झालं नाही. त्याचमुळे मुख्यमंत्री आदित्यनाथ 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते रतन टाटा, आदित्य बिर्ला यांच्यासारख्या दिग्गज उद्योगपतींना गुंतणूकीसाठी आवाहन करत आपला प्रस्ताव सादर करतील.

संबंधित बातम्या :

’28 व्या क्रमांकावरील पिछाडीचं राज्य 5 व्या क्रमांकाच्या राज्याला शिकवतंय’, केसीआर यांचा आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल

योगी सरकारनं अयोध्या विमानतळाचं नाव बदललं, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असं नामकरण

योगी सरकारकडून लव जिहादविरोधात अध्यादेश जारी, दोषींना 10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद

UP CM Yogi Adityanath on two day Mumbai tour will meet Businessman to appeal invest in UP

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.