हाथरस बलात्कारप्रकरणी चौकशीला वेग; SIT कडून गावकऱ्यांची चौकशी तर DIG पीडित कुटुंबाच्या भेटीला

हाथरस बलात्कारप्रकरणी चौकशीला वेग आला आहे. यूपीचे डीआयजी शलभ माथूर यांनी शुक्रवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली. UP DIG Shalabh Mathur Meet Victim Family Of hathras

हाथरस बलात्कारप्रकरणी चौकशीला वेग; SIT कडून गावकऱ्यांची चौकशी तर DIG पीडित कुटुंबाच्या भेटीला
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 8:58 PM

हाथरस : हाथरसप्रकरण समोर आल्यानंतर आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT गठीत करण्यात आली आहे. काल (गुरूवारी) गावातल्या काही लोकांना नोटीस देण्यात आली होती. आज या लोकांची SIT ने चौकशी केली. (UP DIG Shalabh Mathur Meet Victim Family Of hathras)

गावकऱ्यांशी बातचीत करून या प्रकरणासंबधीचे काही धागेदोरे हाती लागतात का? काही खुलासे होतात का? यासाठी SIT प्रयत्नशील आहे. सध्या या गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. गावतल्या प्रत्येक हालचालीवर पोलिस नजर ठेवून आहेत. याचबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही अनुचित घडणार नाही, यासंदर्भात तिथे बनवलेल्या तात्पुरत्या कंट्रोल रूममधून पोलीस देखरेख करत आहेत.

DIG शलभ माथुर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांच्या व्यथा जाणून घेऊन तुम्हाला न्याय नक्की मिळेल. पोलीस तुमच्या सोबत आहेत, असं आश्वासन त्यांनी पीडित कुटुंबाला दिलं. सोबतच पीडित कुटुंबाला पुरवण्यात आलेल्या सुरक्षेविषयी त्यांनी माहिती घेतली.

दरम्यानच्या काळात हाथरसप्रकरणाचा एक व्हीडिओ समोर आला होता. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीचा तो व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय. यामध्ये बरेच लोक दिसत आहेत. त्यामुळे त्या लोकांचीही चौकशी केली जाऊ शकते.

पीडितेच्या कुटुंबाकडून सुरक्षेविषयी सतत बोललं जात आहे. या गावात आम्ही सुरक्षीत नाही. आम्हाला या भागातून बाहेर घेऊन जा. गावातल्या काही लोकांकडून आमच्या जीवाला धोका आहे, असं पीडित कुटुंब म्हणत आहेत. त्यामुळे या कुटुंबाला सुरक्षीत वाटावं, म्हणून सरकारकडून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यात खासगी सुरक्षारक्षकांसह पोलिसांचा समावेश आहे.

हाथरस प्रकरणामध्ये आरोपींनी बलात्कार करून तरूणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर कुटुंबानेच हत्या केल्याचा खळबळजनक दावा आरोपींनी केला आहे. त्यामुळे एसआयटीच्या रिपोर्टकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

(UP DIG Shalabh Mathur Meet Victim Family Of hathras)

संबंधित बातम्या

पीडितेला तिच्या आई आणि भावानेच मारले; हाथरस हत्याकांडातील आरोपींचा खळबळनजक दावा

हाथरस बलात्कार प्रकरणात वेगळे वळण, आरोपी-पीडितेच्या भावात 104 वेळा कॉल, नेमकं कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

रामदास आठवलेंकडून हाथरस पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट

…तर दंगली भडकल्या असत्या, हाथरस प्रकरणी यूपी सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.