UP Election Exit polls Result 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज, कुणाला किती जागा?
संपूर्ण देशाला सध्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचे वेध लागले आहेत. दोन दिवसातच निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्याआधी आज एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यात उत्तर प्रदेशातला एक्झिट पोल भाजपच्या बाजून आलाय.
उत्तर प्रदेश : संपूर्ण देशाला सध्या पाच राज्यांच्या निवडणूक (Five State Election 2022) निकालाचे वेध लागले आहेत. दोन दिवसातच निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्याआधी आज एक्झिट पोलचे (Up Exit poll results) आकडे समोर आले आहेत. यात उत्तर प्रदेशातला एक्झिट पोल भाजपच्या बाजून आलाय. उत्तर प्रदेशात (Up Elections 2022) पुन्हा भाजपची सत्ता येईल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. TV9 भारतवर्ष-पोलेस्टरच्या एक्झिट पोलनुसार, यूपीमध्ये भाजपला 211 ते 225 जागा, सपाला 146 ते 160, बसपाला 14 ते 24, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 4 ते 6 जागा मिळू शकतात. युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात कुणाला किती जागा?
यूपीत भाजप मोठा पक्ष
सुरुवातीच्या एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिल्याचे दिसून येत आहे. यूपी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सपा यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. आता TV9 भारतवर्ष/पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोल ट्रेंडमध्ये, भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर सपा त्यांना कडवी झुंज देत आहे. दोघांमध्ये काटे की टक्कर होणार असेच एकंदरीत चित्र दिसतंय. समाजवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आणि बहुजन समाज पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, भाजपला जागांचे मोठे नुकसान होताना दिसत असून सपा दीडशेहून अधिक जागा मिळवण्याच्या स्थितीत आहे.
कुणाला किती टक्के मतदान?
मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला 40.1 टक्के, सपाला 34.93 टक्के, 14 टक्के, बसपाला 7.4 टक्के आणि इतरांना 3.6 टक्के मते मिळू शकतात. यूपी विधानसभेत एकूण 403 जागा आहेत आणि बहुमतासाठी 202 जागा आवश्यक आहेत. भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे, पण त्यांना किमान 100 जागांचे नुकसान होत आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व त्यांचा पक्ष 300 चा आकडा पार करणार असल्याचा दावा करत आहेत.
Exit Poll Results 2022 LIVE : उत्तर प्रदेश गोव्यात भाजप, पंजाबमध्ये आपची सत्ता येण्याची शक्यता