नवी दिल्ली : उत्तर प्रदेश रोडवेजची बस थांबवून नमाज अदा केल्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरवर झालेल्या कारवाईवरून प्रचंड गदारोळ माजला आहे. या प्रकरणावरूनच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नमाज पठाण केले तर तुमच्या कोणते संकट आले, आणि तुम्ही का आक्षेप घेता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. नमाज पठण केल्यानंतर गुन्हा वाटत असेल तर सरकारी कार्यालयामध्ये असणाऱ्या धार्मिी गोष्टीही नको अशा शब्दात त्यांनी जोरदार टीका केली आहे.
हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी एका सभेला संबोधित करताना या घटनेचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बस उत्तर प्रदेशातील बरेली येथून जात असल्याचा त्यांनी संदर्भ दिला आहे.
रस्त्यामध्ये बस थांबल्यानंतर काही मुस्लिम म्हणाले की भाई, तीन मिनिटे थांबा. आम्ही नमाज पठण करणार आहे. त्यावेळी केवळ दोन मुस्लिमांनीच नमाज पठाण केले होते.
त्याप्रकरणी आता कृष्णपाल सिंग या चालकाला निलंबित केले गेले आहे. तर मोहित यादवला बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी केवळ दोन मिनिटे नमाज पठण केले.
असदुद्दीन ओवेसी यांनी म्हणाले आहे की, नमाज पठण केले सर्वनाश झाला का? नमाज अदा करणे हा गुन्हा असेल तर संपूर्ण सरकारी कार्यालयात असलेली धार्मिक गोष्टीही थांबवा अशी मागणीच त्यांनी केली आहे.
कोणत्याही जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन असो, सचिवालय असला तरी त्याप्रकरणी कोणताही धार्मिक उत्सव असू नये असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
बस दोन मिनिटे थांबल्यावर आपण बसच्या चालकाला निलंबित केले आणि कंत्राटी कर्मचारी कंडक्टर मोहित यादव याला बडतर्फ केले. मात्र इतर वेळी तुम्ही विकास आणि विश्वासाच्या गोष्टी का सांगता असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
हे प्रकरण ३ जूनचे असल्याचे सांगण्यात येत असून यूपी रोडवेजची जनरथ बस बरेलीहून कौशांबीला येत होती. त्यावेळी वाटेत दोन मुस्लिम तरुणांनी चालकाला नमाज अदा करण्यासाठी बस थांबवण्याची विनंती केली होती.
त्यांच्या त्या विनंतीवरून चालकाने दोन मिनिटे बस रस्त्याच्या कडेला थांबवली होती. त्यावेळी दोन्ही युवकांनी नमाज पठण केले, मात्र यावेळी बसमधील काही प्रवासी नाराज झाले व त्यांनी त्यावर आक्षेपही घेतला.
दरम्यान, काही प्रवाशांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रचंड जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणामुळे तातडीने कारवाई करण्यात आली असून चालकाला निलंबित केले आहे तर कंडक्टरलाही कामावरून काढून टाकण्यात आले आहे.