देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील 50 टक्के मुलांपर्यंत इंटरनेट सुविधा नाही!

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील 50 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील 50 टक्के मुलांपर्यंत इंटरनेट सुविधा नाही!
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 2:49 PM

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम उद्योगधंदे, व्यापार, आदी गोष्टींवर झाला आहेच. सोबतच शिक्षणक्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर नियमावली जारी करुन शाळा सुरु करण्यात आल्या. पण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाईनचा पर्याय निवडण्यात आलाय. पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील 50 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.(50 percent of students in urban and rural areas do not have access to internet)

सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षेबाबत एका लर्निंग स्पायलरने सर्वेक्षण केलं आहे. त्यात हे स्पष्ट झालं आहे की, ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत इंटरनेटची सुविधाच नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षांचा पर्यायही कमी पडल्याचं दिसून येत आहे.

सर्वेक्षणातून काय समोर?

1. केरळमधील 51 टक्के ग्रामीण भागातील कुटुंबांची इंटरनेटपर्यंत पोहोच आहे. पण केवळ 21 टक्के कुटुंबांच्या घरातच ही सुविधा आहे.

2. आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये 30 टक्के कुटुंबांची पोहोच इंटरनेटपर्यंत आहे. पण फक्त 2 टक्के कुटुंबांकडेच ही सुविधा उपलब्ध आहे.

3. पश्चिम बंगाल आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये फक्त 7 – 8 टक्के ग्रामीण कुटुंबांची पोहोच इंटरनेटपर्यंत आहे. तर शहरांमध्ये हे प्रमाण 18 ते 21 टक्क्यांपर्यंत आहे.

4. शहरांमध्ये राहणाऱ्या जवळपास 85 टक्के विद्यार्थ्यांची इंटरनेटपर्यंत पोहोच आहे. पण फक्त 41 टक्के विद्यार्थ्यांकडेच ही सुविधा उपलब्ध आहे.

5. ग्रामी भागात शिकणाऱ्या 28 टक्के विद्यार्थांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे.

6. ग्रामीण भागात शिकणाऱ्या 48 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधाच नाही.

7. फक्त 42 टक्के ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरीच इंटरनेटचा वापर केला जातो. तर शहरीत भागातील 69 टक्के विद्यार्थी ऑनलाईन राहू शकतात.

दुर्गम भागात वीज आणि इंटरनेट पोहोचवणं कठीण

याबाबत लर्निंग स्पायलरचे एमडी मनीष मेहता यांनी सांगितलं की, दुर्गम भागात वीज आणि इंटरनेची सुविधा पोहोचवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. मात्र, आव्हान पेललं तरंच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कंम्प्यूटर आणि स्मार्टफोनसारख्या साधनांचा वापर केला जाऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणासाठी वीजेची मोठी गरज आहे. वीज असेल तरच इंटरनेट कनेक्ट केलं जाऊ शकतो. इंटरनेट आणि साधनांची कमतरताही ऑनलाईन शिक्षणात मोठी अडचण निर्माण ठरु शकते.

इतर बातम्या :

Metro Man E Sreedharan | मेट्रोमॅन ई. श्रीधरन भाजपमध्ये जाणार, विजय यात्रेदरम्यान प्रवेश करणार

Corona Guidelines | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी

50 percent of students in urban and rural areas do not have access to internet

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.