UPSC 2019 | यूपीएससी 2019 चे निकाल जाहीर, प्रदीप सिंह देशात अव्वल
विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
UPSC Results 2019 नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. प्रदीप सिंह देशात अव्वल आला, तर जतीन किशोर देशात दुसरा आहे. प्रतिभा वर्मा देशात तिसरी, तर महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे. (UPSC Civil Services Exam 2019 Results Declared Pradeep Singh Tops)
यूपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट 2020 मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
2019 मध्ये प्रथमच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत राबवल्या गेलेल्या ‘ईडब्ल्यूएस कोटा’ (आर्थिकदृष्ट्या मागास) अंतर्गत 78 उमेदवारांची निवड झाली आहे. तर 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा :
महाराष्ट्रातील गुणवंत नेहा भोसले – देशात 15 मंदार पत्की (बीड) – देशात 22, राज्यात दुसरा योगेश अशोकराव पाटील – देशात 63 राहुल लक्ष्मण चव्हाण – देशात 109
यूपीएससी दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस- IAS),भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस – IFS), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस- IPS)आणि इतर केंद्रीय सेवांसाठी परीक्षा घेते.
नागरी सेवा परीक्षा 2020 या 31 मे रोजी होणार होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या 4 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
#UPSC result declared 2020 pic.twitter.com/3lotPQiVJd
— Piyush ratan (@Piyush91733030) August 4, 2020
Final List #UPSC Many Congratulations To All Sucess Candidate ?? pic.twitter.com/uVwq7ZNuQ7
— Balaji Ankit Pathak (@Balaji_Ankit) August 4, 2020
(UPSC Civil Services Exam 2019 Results Declared Pradeep Singh Tops)