मुंबई : प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार आणि चित्रपट निर्माते कवी गुलजार यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांचीसुद्धा ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे. 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड झाली आहे.
गुलजार यांना 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण पुरस्कार आणि 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले आहेत. हिंदी सिनेमांमधील त्यांच्या मोठं योगदान असून ते आताच्या काळातील मोठे आणि सर्वांच्या मनावर राज्य करणारे उत्कृष्ट उर्दू कवी मानले जातात. चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते आहेत. रामभद्राचार्य यांनी 100 हून पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.
गुलजार यांचं पुर्ण नाव गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा असं आहे. 18 ऑगस्ट 1936 मध्ये गुलजार यांचा पंजाबमधील दीना येथे झाला होता. आता दीना हे शहर पाकिस्तानमध्ये आहे. फाळणी झाल्यावर गुलजार यांचं कुटुंब अमृतसरमध्ये आलं होतं. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि इकडेच स्थायिक झाले होते.
जन्म झाल्यावर दोन महिन्यांत जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी दृष्टी गमावली होती. रामभद्राचार्य यांना 100 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना 22 भाषांचे ज्ञान आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना भारत सरकारने 2015 ध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.