Donald Trump India Tour LIVE : अमेरिका भारताचा ‘सच्चा दोस्त’ : मोदी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर आहेत.

Donald Trump India Tour LIVE : अमेरिका भारताचा 'सच्चा दोस्त' : मोदी
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 2:38 PM

गांधीनगर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर (Donald Trump On India Tour) आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे (Donald Trump On India Tour). तसेच, ट्रम्प साबरमती आश्रम, आग्र्याचं ताज महाल, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहे.

LIVE UPDATES :

[svt-event date=”24/02/2020,2:35PM” class=”svt-cd-green” ] आज अमेरिका भारताचा मित्र आहे, लष्करी क्षेत्र असेल किंवा व्यापार, भारताचा खरा मित्र अमेरिका आहे [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:33PM” class=”svt-cd-green” ] हे देन व्यक्ती आणि देन देशांमधील विश्वास आहे. अमेरिकेतील भारतीय हे तिथल्या विकासासाठी, देशाच्या मजबुतीसाठी प्रयत्नशील आहेत : मोदी [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:30PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे आधार व्यक्त केले [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:30PM” class=”svt-cd-green” ] We love you India, God bless India : डोनाल्ड ट्रम्प [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:25PM” class=”svt-cd-green” ] अमेरिका-भारत दोघांना मिळून दहशतवादाविरोधात लढायचं आहे. [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:25PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं, उद्या पीएम मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करणार, यामध्ये अनेक करारांवर चर्चा करु, भारत आणि अमेरिका संरक्षण क्षेत्रात विकास करत आहे. आम्ही लवकरच भारताला सर्वात शक्तीशाली मिसाईल आणि शस्त्र देऊ. भारत – अमेरिकेदरम्यानचे आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींशी चर्चा करेन [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:20PM” class=”svt-cd-green” ] भारताला 3 बिलियन डॉलरचे हेलिकॉप्टर आणि संरक्षण साहित्य देण्याचं ट्रम्प यांचं आश्वासन [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:19PM” class=”svt-cd-green” ] भारतात आज हिंदू, जैन, मुस्लिम, शिखसह अनेक धर्मांचे लोक राहतात. इथे अनेक भाषा बोलल्या जातात. तरीही या देशात लोक एक होऊन राहतात. अमेरिकेतही भारतियांनी तिथल्या विकासात मोठं योगदान दिलं आहे. [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:17PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांचाही उल्लेख केला. उद्या फर्स्ट लेडी आणि मी राजघाटवर झाडे लावणार आहोत, महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. आज आम्ही साबरमती आश्रमाला भेट दिली [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:15PM” class=”svt-cd-green” ] अमेरिका आणि भारतात अनेक साम्य आहेत. प्रत्येक व्यक्ती समान आहे. [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:10PM” class=”svt-cd-green” ] भारत दरवर्षी 2000 पेक्षा जास्त सिनेमे तयार करतो. बॉलिवूडचं संपूर्ण जगात कौतुक केलं जातं, लोक भांगडा-म्युझिकबाबत सांगतात, लोकांना DDLJ ही खूप आवडतो. तसेच, भारताने जगाला सचिन, विराट कोहली सारखे मोठे खेळाडू दिले : ट्रम्प [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:08PM” class=”svt-cd-green” ] माझ्या देशाला तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद [/svt-event]

अमेरिका नेहमीच भारताचा विश्वासू आणि प्रामाणिक मित्र राहील, नेत्रदीपक स्वागताबद्दल धन्यवाद, आम्ही हा भारावून टाकणारा पाहुणचार नेहमी लक्षात ठेवू. भारतासाठी आमच्या अंतःकरणात विशेष स्थान आहे : डोनाल्ड ट्रम्प

[svt-event date=”24/02/2020,2:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:04PM” class=”svt-cd-green” ] एक चहावाला देशाचा पंतप्रधान होणं कौतुकास्पद, डोनाल्ड ट्रम्प यांची ‘नमस्ते ट्रम्प’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:03PM” class=”svt-cd-green” ] फर्स्ट लेडी मेलानिया, आपली उपस्थिती आमच्यासाठी सन्मानजनक आहे, आपण निरोगी आणि आनंदी अमेरिकेसाठी केलेल्या कार्याचे परिणाम दिसत आहेत. आपण मुलांसाठी आणि समाजासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे : मोदी [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:03PM” class=”svt-cd-green” ] या कार्यक्रमाचे नाव नमस्ते आहे, याचा अर्थ खूप मोठा आहे, हा एक संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ असा आहे की केवळ व्यक्तीच नाही तर त्याच्यातील देवत्व देखील आहे: नरेंद्र मोदी [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,2:03PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील, याचा विश्वास : नरेंद्र मोदी https:// [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,1:23PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प मोटेरा स्टेडियममध्ये पोहोचले, केंद्रीय मंत्री अमित शाह देखील स्टेडियमवर उपस्थित

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,12:50PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साबरमती आश्रमातून निघाले, यांचा ताफा मोटेरा स्टेडियमकडे रवाना झाले आहेत [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ] साबरमती आश्रमात डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांनी चरखा चालवला, महात्मा गांधींच्या फोटोला हार घालत अभिनंदनही केलं [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,12:27PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी साबरमती आश्रमात दाखल [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ] थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रम येथे पोहोचतील [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,12:14PM” class=”svt-cd-green” ] ट्रम्प आणि मोदींच्या रोड शोला सुरुवात, रोड शो दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे 22 राज्यांच्या सांस्कृतिक चित्ररथ पाहातील

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ] अहमदाबाद विमानतळावर शंखनाद करत ट्रम्प यांचं स्वागत [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान मोंदींकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत, भेटताच मिठी मारली [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद विमानतळावर दाखल [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,11:50AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,11:38AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांचं विमान अहमदाबाद विमानतळावर उतरलं

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदी ट्वीटवर पंतप्रधान मोदींचं ट्वीट, म्हणाले, “अतिथी देवो भव:”

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर दाखल [/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादेत पोहोचले

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] भारतात येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं हिंदीतून ट्वीट, म्हणाले, “आम्ही भारतात येण्यासाठी तयार आहोत. आम्ही रस्त्यात आहोत. काहीच तासांत आपण सर्व भेटू”

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ] गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद विमानतळावर दाखल, ‘अमेरिकेच्या अध्यक्षांचं स्वागत करणे साडे सहा कोटी गुजरातींसाठी अभिमानाची गोष्ट. पहिल्यांदा गुजरातच्या यात्रेवर येणाऱ्या ट्रम्प यांचं स्वागत’, रुपानींचं ट्वीट

[/svt-event]

[svt-event date=”24/02/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज, निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन

[/svt-event]

Donald Trump On India Tour

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.