Uttar Pradesh : योगींच्या शपथविधीला काही तास शिल्लक, लखनऊमध्ये एनकाऊंटरची घटना
उत्तर प्रदेशचे काळजीवाहून मुख्यमंत्री आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याने शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असताना लखनऊमध्ये एनकाऊंटरची घटना समोर आली आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) काळजीवाहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM yogi aadityanath) दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याने शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असताना लखनऊमध्ये एनकाऊंटरची घटना समोर आली आहे. हसनगंज परिसरातील राहुल सिंह नावाच्या चोराचा पोलिसांनी एनकाऊंटर केला आहे. एनकाऊंटरमध्ये मृत्यू झालेल्या राहुल सिंह याने एका सोन्याच्या दुकानात दरोडा टाकला होता. मात्र, शपथविधी सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या एनकाऊंटरकडे (encounter) एका वेगळ्या नजरेतून पाहिलं जातंय. योगी आदित्यनाथ हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर आणि दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. यातच लखनऊमधून एनकाऊंटरची घटना समोर आल्याने उत्तर प्रदेशात शपथविधी आधीच दहशत पसरली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या राहुल सिंगला लखनऊ पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ४ वाजता हसनगंज परिसरात घेरले. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. अलीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बंधा रोडवर झालेल्या चकमकीत राहुल सिंग जखमी झाला. त्यांना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
शपथविधीपूर्वी एनकाऊंटरची चर्चा
कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत रहावी यासाठी कोणतंही सरकार प्रयत्न करतं असंत. मात्र, योगी आदित्यनाथ हे दुसऱ्यांदा शपथ घेत असताना, उत्तर प्रदेशात आनंदाचे वातावरण असताना लखनऊमध्ये एनकाऊंटर करण्यात आल्याने सध्या उत्तर प्रदेशात याची चर्चा आहे.
योगींच्या शपथविधीची तयारी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भाजप विधिमंडळ पक्षाचे ज्येष्ठ सदस्य सुरेशकुमार खन्ना यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यावर सर्व आमदारांनी सहमती दर्शवली. अर्थात, योगी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी फेरनिवड होणे अपेक्षितच होते. लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर योगी मंत्रिमंडळाचा भव्य शपथविधी सोहळा होणार आहे.
लखनऊमध्ये शपथविधीपूर्वी एनकाऊंटर
आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याने शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असताना लखनऊमध्ये एनकाऊंटरची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे शपथविधीची चर्चा आहे तर दुसरीकडे एनकाऊंटरची.