Road Accident | स्कॉर्पियो डिव्हाईडर ओलांडून ट्रकवर धडकली, नऊ प्रवाशांचा मृत्यू
बिहारमधील गयाहून 12 प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पियो उत्तर प्रदेशला निघाली होती. (Uttar Pradesh Agra Scorpio Road Accident)
लखनौ : उत्तर प्रदेशातील आग्य्रात स्कॉर्पियो आणि ट्रकचा भीषण अपघात (Agra Road Accident) झाला. अपघातावेळी स्कॉर्पियोमध्ये बारा प्रवासी असल्याची माहिती आहे. ट्रक आणि स्कॉर्पियोची धडक इतकी जबरदस्त होती, की नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत. (Uttar Pradesh Agra Scorpio Car Truck Road Accident)
बिहारहून उत्तर प्रदेशला जाताना अपघात
बिहारमधील गयाहून 12 प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पियो उत्तर प्रदेशला निघाली होती. आग्रा शहरात एत्माउद्दौला भागात स्कॉर्पियोची टक्कर ट्रकसोबत झाली. ही धडक इतकी भीषण होती, की त्यामध्ये आठ जणांना जागीच प्राण गमवावे लागले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तिघे जण गंभीर जखमी झाले.
दोनो गाड़ियां विपरीत दिशा में जा रही थीं। स्कार्पियो के हाईवे पर नियंत्रण खोकर डिवाइडर पार करके दूसरी तरफ आ जाने से यह दुर्घटना हुई। घायलों को इलाज के लिए अस्पताल भेजा गया है: SP आगरा https://t.co/5qH7PTUtQ1 pic.twitter.com/rIdQ2GkhGw
— ANI_HindiNews (@AHindinews) March 11, 2021
स्कॉर्पियो दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला
आग्रा शहरात एत्माउद्दौला भागातील बाजर समितीजवळ हा अपघात झाला. स्कॉर्पयो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर ती धडकली. यामध्ये आठ प्रवाशांना प्राण गमवावे लागले.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नऊ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Uttar Pradesh Agra Scorpio Car Truck Road Accident)
9 people die after SUV collides with tractor-trolley in Uttar Pradesh’s Agra district: Police
— Press Trust of India (@PTI_News) March 11, 2021
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर कालच ट्रेलर आणि ट्रकचा जोरदार अपघातात झाला होता. यामध्ये दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. केमीकल ड्रम भरलेल्या ट्रकमुळे दोन्ही वाहने आगीच्या भक्षस्थानी गेली. पुण्याकडे जाताना बोरघाटाच्या सुरुवातीला हा अपघात झाला होता. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक थाबंवली काही काळ थांबवण्यात आली होती. मात्र, पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दोन्ही मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु करण्यात आली.
संबंधित बातम्या :
सुधीर मुनगंटीवारांच्या नातेवाईकाच्या कारला भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ट्रक-ट्रेलरचा अपघात, दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी
(Uttar Pradesh Agra Scorpio Car Truck Road Accident)