Atiq Ahmed : ‘अतिक अहमद याला भारतरत्न द्यावा’, काँग्रेस नेत्याची अजब मागणी

| Updated on: Apr 19, 2023 | 10:22 PM

अतिक अहमद आणि अशरफ अहमद जागीच ठार झाले.  (Yogi Adityanath government) या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. तसंच अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येचे प्रकरण शमलं नसतानाच आता काँग्रेसच्या नेत्याने अजब वक्तव्य केलं आहे.

Atiq Ahmed : अतिक अहमद याला भारतरत्न द्यावा, काँग्रेस नेत्याची अजब मागणी
Atique Ahmed
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांचा भररस्त्यात मीडियासमोरच एन्काऊंटर करण्यात आला आहे. (Prayagraj) या गोळीबारात अतिक अहमद आणि अशरफ अहमद जागीच ठार झाले.  (Yogi Adityanath government) या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. तसंच अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येचे प्रकरण शमलं नसतानाच आता काँग्रेसचे नगरसेवक उमेदवार राजकुमार सिंह उर्फ ​​रज्जू यांनी नवा वाद निर्माण केला आहे.

राजकुमार सिंह यांनी अतिक अहमदला भारतरत्न द्या, अशी मागणी केली आहे. तसंच अतिक शहीद झाला आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसंच या प्रकरणाची दखल घेत पक्षाने राजकुमार सिंह यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

 

अतिक अहमद प्रकरणाबाबत बोलताना राजकुमार यांनी यूपी सरकारवर आरोप केले आहेत. तसेच जर सपाचे दिवंगत संरक्षक मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण मिळू शकतो, तर अतिक यांना का सन्मानित केले जाऊ शकत नाही, असं राजकुमार यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानानंतर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत राजकुमार सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

राजकुमार यांनी गँगस्टर अतिकशी संबंधित वक्तव्य केल्याने ही कारवाई केल्याचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिश्रा अंशुमन यांनी सांगितले आहे.  राजकुमार यांचे हे वैयक्तिक वक्तव्य असून, याच्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही, असेही अंशुमन यांनी सांगितलं. पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत रज्जू यांची नगरसेवकपदाची उमेदवारीही मागे घेतली आहे.