जितेंद्र आव्हाड राक्षसी प्रवृत्तीचे, त्यांना चप्पलांचा हार घालून…; थेट अयोध्येतून शरद पवार यांना आवाहन

| Updated on: Jan 04, 2024 | 3:31 PM

Ayodhya Rajudas Maharaj on Jitendra Awhad Statement About Ram : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांना हनुमान गढीचे महंत राजुदास यांचं आवाहन, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड राक्षसी प्रवृत्तीचे आहे, असा घणाघात त्यांनी केलाय.

जितेंद्र आव्हाड राक्षसी प्रवृत्तीचे, त्यांना चप्पलांचा हार घालून...; थेट अयोध्येतून शरद पवार यांना आवाहन
Follow us on

प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, अयोध्या- उत्तर प्रदेश | 04 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आव्हाड यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. अशातच प्रभूरामाची जन्मभूमी असलेल्या उत्तर प्रदेशमधून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यात आली आहे. हनुमान गढीचे महंत राजुदास महाराज यांनी आव्हाडांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. जितेंद्र आव्हाड हे राक्षसी प्रवृत्तीचे असल्याचं राजुदास महाराज यांनी म्हटलं आहे. राजुदास महाराज यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आवाहन केलं आहे.

“आव्हाड राक्षसी प्रवृत्तीचे”

जितेंद्र आव्हाड हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. जितेंद्र आव्हाडांना चप्पलाच हार घालून त्यांना पक्षातून हाकलून द्या, असं आवाहन महंत राजुदास महाराज यांनी शरद पवारांना केलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी आवाहन केलं आहे. शिंदेजी, आपण जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई त्यांच्या वर कारवाई करावी, असं महंत राजुदास यांनी म्हटलं आहे.

महंत राजुदास म्हणाले…

जितेंद्र आव्हाड जिथे जातील. तिथे हिंदू त्यांना चपलाचा हार घालतील. उद्धच ठाकरे यांनी रामद्रोहीशी सरकार बनवलं. त्यांनी हे महापाप केलं आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं नाव, चिन्ह, फंड त्यांच्या हातून गेला आहे. ते विरोधी पक्षाच्या क्षमतेचे पण राहिलेले नाहीत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मानसिकता काही कळत नाही. त्यांनी वडिलांच्या विचारांपासून फारकत घेतली आहे. अयोध्या बदलतीय अयोध्येत विकास होत आहे, असं महंत राजुदास म्हणाले.

आव्हाडांचं वक्तव्य काय?

प्रभू राम मांसाहारी असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी काल म्हटलं. अशातच आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. मी इतिहासाची मोडतोड करत नाही. अभ्यासाशिवाय मी कोणतंही वक्तव्य करत नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर राम जन्मभूमीतील महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचं विधान पूर्णपणे चुकीचं आहे. राम ज्यावेळी वनवासाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कंदमुळे आणि फळं खाल्ली हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे , असं सत्येंद्र दास म्हणाले.