‘जामा मशीद बॉम्बने उडवून देऊ; इमामालाही गोळ्या घालू; या धमकीने बरेली हादरली

इमाम खुर्शीद आलम यांनी पोलिसांना सांगितले आहे की, माझी कोणाशीही दुश्मनी नाही, किंवा कोणताही कोणाशीही वादही नाही. मात्र भडकाऊ पोस्टर लावून येथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

'जामा मशीद बॉम्बने उडवून देऊ; इमामालाही गोळ्या घालू; या धमकीने बरेली हादरली
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 11:00 AM

नवी दिल्लः बरेलीतील जामा मजामा मशीद बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांकडून आता परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेऊन तपास चालू करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली होती. जामा मशीद परिसरातील सामाजिक वातावरण बिघडवण्यावासाठी कागदावर मजकूर लिहून तो कागद मशीदीवर लावून आरोपी पळून गेला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून 250 किलो मीटर दूर असलेल्या आणि झुमका शहर म्हणून ओळख असलेल्या बरेलीतील सामाजिक आणि राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बरेलीतील जामा मशीद बॉम्बने उडवून देण्याची दिली गेली आहे, त्या चिठ्ठीत जुमे के दिन मस्जिद को बम से उडा दिया जाएगा अशी चिठ्ठी लिहून ती भिंतीवर लावण्यात आली आहे. या चिठ्ठीत इमामालाही गोळी घालण्याची धमकी देण्यात आली आहे.

या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून कसून चौकशीला प्रारंभ केला आहे. ही चिठ्ठी ताब्यात घेऊन परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

इमामांनी पोलिसांनी दिली माहिती

या घटनेनंतर इमाम खुर्शीद आलम यांनी पोलिसांना सांगितले आहे की, माझी कोणाशीही दुश्मनी नाही, किंवा कोणताही कोणाशीही वादही नाही. मात्र भडकाऊ पोस्टर लावून येथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे पोस्टर लावून वातावरण खराब करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असून शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

जामा मशिद परिसरात सीसीटीव्ही नाही

ज्यांनी या प्रकारचे पोस्टर्स भिंतीवर लावली आहेत, त्यांना माहिती आहे की, जामा मशिदीच्या परिसरात सीसीटीव्ही नाहीत, त्यामुळेच असे पोस्टर्स लावून त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी सुरु केली असून गेल्या काही तासांपासून परिसरातील नागरिकांकडून याबाबत माहिती घेतली जात आहे.

पोलिसांनी केले शांततेचे आवाहन

या धमकीमुळे पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून सहकार्य करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुल भाटी यांनी सांगितले की, परिसरात लावलेले पोस्टर्स पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरुवात केली आहे, त्यासाठी परिसरातील सीसीटीव्हींची चौकशी सुरु करण्यात आल्याचे राहुल भाटी यांनी सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.