लखनऊ : महाराष्ट्रापाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. कोरोनाचा संसर्ग आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचलाय. योगींच्या कार्यालयातील अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतलाय. तशी माहिती योगी यांनी ट्वीट करुन दिली आहे. आज दुपारपर्यंत योगी आदित्यनाथ कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत काम करताना पाहायला मिळाले होते. (Uttar Pradesh CM Office staff Corona Positive, Yogi Adityanath Quarantine)
“माझ्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे अधिकारी माझ्या संपर्कात होते. खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व बैठका या व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे करण्यात येतील”, असं ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केलंय.
मेरे कार्यालय के कुछ अधिकारी कोरोना से संक्रमित हुए हैं।
यह अधिकारी मेरे संपर्क में रहे हैं, अतः मैंने एहतियातन अपने को आइसोलेट कर लिया है एवं सभी कार्य वर्चुअली प्रारम्भ कर रहा हूं।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 13, 2021
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. महाराष्ट्रापाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी धर्मगुरुंसोबत व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे चर्चा केली. ‘आपल्याला मोठी खबरदारी घेण्याची गरज आहे. आजपासून नवरात्र आणि उद्यापासून रमजान सुरु होत आहे. सर्व धर्मगुरुंना माझं निवेदन आहे की, त्यांनी भाविकांना कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना कराव्यात’, असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी धर्मुगुरुंना केलं आहे.
गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशात 18 हजार 21 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 10 हजार 36 झाली आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करु शकतात. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आज माध्यमांना सांगितलं होतं.
संबंधित बातम्या :
Uttar Pradesh CM Office staff Corona Positive, Yogi Adityanath Quarantine