झोपले असताना अचानक घरात मगर घुसली! रात्रभर मगरीसोबत घरात लॉक राहिले कारण…

मगरीला लागली भूक, भक्ष्य शोधत लांब आली खूप! थेट घुसरली घरात, संपूर्ण रात्र सुरु होतात थरार

झोपले असताना अचानक घरात मगर घुसली! रात्रभर मगरीसोबत घरात लॉक राहिले कारण...
मगरीला पकडण्याचा थरारImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 3:20 PM

उत्तर प्रदेश : रात्री घरातील सर्वजण झोपेत असताना अचानक घरात मगर (Crocodile) घुसली तर काय होईल? अर्थात सगळ्यांची झोप उडेल! पण त्याच मगरीसोबत अख्खी रात्र घरातच काढावी लागली तर…? या प्रश्नाचा नुसता विचारही अंगावर काटा आणणारा आहे. पण उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जैतिया (Jaitia) गावातील एका कुटुंबाने खरंत रात्रभर एका लॉक घरात मगरीसोबत रात्र घालवली आहे. जीव मुठीत धरुन रात्र जागून काढलेल्या या कुटुंबाने जे अनुभवलं, ते थरकाप उडवणारं होतं. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घरात अचानक शिरलेली मगर सकाळी 6 वाजेपर्यंत घरातच लॉक होती. मगर पळून जाऊन तिला पकडण्यात अडचणी येतील म्हणून घर लॉक करण्यास सांगण्यात आलं होतं. अखेर सकाळी 6 वाजता हा मगरीला पकडण्यासाठी घराचं लॉक उघडण्यात आलं.

घरात मगर शिरल्याची माहिती जैतिया गावातील लोकांना स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी मगरीला पकडण्यासाठी वन विभागाचे तज्ज्ञ आशिष त्रिपाठी यांची मदत मागितली. त्यांनी तातडीने घर बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मगर घरात असताना घरातील माणसांसह घर बंद करण्यात आलं.

मगर घरात शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील लोकं घराबाहेर जमा झाले. रात्रभर गावातल्या लोकांशी आतून-बाहेरुन संवाद सुरु होता. भयभीत झालेले घराच्या आतील सदस्यांना घाम फुटला होता. पण उजेड होईपर्यंत मगरीला पकडणं कठीण असल्यानं अखेर घर बंद ठेवण्यात आलेलं.

हे सुद्धा वाचा

अखेर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घर उघडण्यात आलं. मगरीला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं. एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आलं. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांचा जीव भांड्यात पडला.

हरनाम सिंह यांच्या घरात ही मगर शिरली होती. घरात शिरलेली मगर 8 फूट लांब होती. मगर नेमकी घरात शिरली कशी काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी घडलेला सगळा थरार काय होता, ते सांगितलं.

मगर भक्ष्याच्या शोधात फिरत फिरत आमच्या घरापर्यंत आली होती. रात्री उशिरा कधी नव्हे ते घराबाहेरी बकऱ्या आवाज करुन लागल्या होत्या. माझी आवाज बाहेर बघण्यासाठी जात होती, त्यासाठी तिने दरवाजा उघडला आणि इतक्यात अनर्थ घडला. मगर तितक्यात घरात घुसली, असं हरमन सिंग यांनी म्हटलंय.

दरम्यान, पकडण्यात आलेली मगर हे दीड ते दोन वर्षांची असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. रात्री तिला पकडणं अधिक धोक्याचं आणि आव्हानात्मक असल्यामुळे मगरीला पकडण्यासाठी सकाळपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.