एक दिवसासाठी वर्दी घातली, मुलीचं कायद्यावर बोट, विनाहेल्मेट वडिलांना दंड ठोठावला
उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एक दिवसाची ठाणेदार बनलेल्या मुलीने वडिलांचंच चालान कापलं.
लखनौ : उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एक दिवसाची ठाणेदार बनलेल्या मुलीने वडिलांचंच चालान कापलं (Daughter Cut Off Fathers Challan). कर्तव्याप्रती जबाबदारी सांभाळत बीएससीची विद्यार्थिनी आकांक्षा गुप्ता एक दिवसाची ठाणेदार झाली. त्यानंतर तिने विना हेल्मेट जाणाऱ्या वडिलांचं चालान कापलं. सोबतच तिने भविष्यात अशी पुन्हा न करण्याचे निर्देशही दिलेत. बालिका दिनाच्या औचित्याने इटावाच्या ऊसराहार पोलीस ठाण्यात आकांक्षा गुप्ताला प्रमुख प्रभारी पदाचा कारभार सोपवण्यात आला. एक दिवसासाटी ठाणेदार झालेली आकांक्षाने तक्रारदारांची तक्रार नोंद करण्यापासून ते अतिक्रमणापासून मुक्तीपर्यंतच्या तक्रारींवर कारवाईचे निर्देश दिले आहेत (Daughter Cut Off Fathers Challan).
एक दिवसांची ठाणेदार बनून आकांक्षा आनंदी होती. प्रमुख प्रभारीच्या खुर्चीवर बसल्यानंतर आकांक्षाने तक्रारदारांच्या तक्रारी शांतपणे ऐकल्या आणि त्यानंतर वास्तविक प्रभारी अमर पाल सिंग आणि उप-निरिक्षक धर्मेंद्र शर्मा यांच्यासोबत पोलीस वाहनात बसून गस्तीवर निघाली.
‘भविष्यात अशी चूक करु नका’
या प्रकरणी आकांक्षाने पत्रकारांशी संवाद साधला. “अधिकाऱ्यांनी तपासावेळी कुठल्याप्रकारच्या दबावाखाली नाही आलं पाहिजे”, असं ती म्हणाली. तसेच, सर्वांना पहिल्यांदा आपल्या घरात सर्व सेट करायला हवं, असं म्हणत तिने हेल्मेटकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ठाण्याचं निरिक्षण आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा परिचय प्राप्त केल्यानंतर आकांक्षा गुप्ता मार्केटमध्ये चेकिंगसाठी निघाली (Daughter Cut Off Fathers Challan).
गाड्यांच्या चेकिंग दरम्यान आकांक्षाला विना हेल्मेट जाणारे तिचे वडील दिसले. तिने वडिलांनी बाईक थांबवली आणि चालान भरण्याचे निर्देश दिले. पित्यानेही भविष्यात पुन्हा कधी अशी चुकी न करण्याची शपथ घेतली.
पोलिसांचं कामाला जवळून पाहाण्याचा आणि समजण्याची संधी मिळाली, असं आकांक्षाने सांगितलं. तसेच, मुली आता समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, असंही तिने सांगितलं.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी दिवसभरासाठी सृष्टी गोस्वामी, वाचा ‘नायक’ची खरीखुरी स्टोरीhttps://t.co/M9nq5R5dql#OneDayCM #SrishtiGoswami
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
Daughter Cut Off Fathers Challan
संबंधित बातम्या :
सृष्टी गोस्वामी होणार उत्तराखंडची एक दिवसाची मुख्यमंत्री; विधानसभेलाही संबोधित करणार