मयतांवर दारुचा अंमल, दामटले टॅक्टर आणि घडला अनर्थ…
ट्रॅक्टर ट्रॉलीतील जखमीं असलेल्या प्रीतीने सांगितले की, ट्रॅक्टरवर बसलेल्या सर्वांनी दारू पिऊन ट्रॅक्टर चालवत होते.
कानपूरः उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये दारू पिऊन ट्रॅक्टर चालवत असताना तोल जाऊन ट्रक्टरसह ट्रॉली ओढ्यात उलटी होऊन 29 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेनंतर त्या अपघातातील जखमींना कानपूरमध्ये (Kanpur) जाऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली, आणि त्यांच्या आरोग्याचीही विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी शासनाकडून जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
त्याचबरोबर या घटनेबाबत अनेक गोष्टीही समोर आल्या आहेत. हा अपघात झाल्यानंतर या अपघातातील प्रत्यक्षदर्शींचे अनेक व्हिडिओही सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत.
ट्रॅक्टर ट्रॉलीतील जखमीं असलेल्या प्रीतीने सांगितले की, ट्रॅक्टरवर बसलेल्या सर्वांनी दारू पिऊन ट्रॅक्टर चालवत होते. या अपघातात ट्रॅक्टर चालकानेही प्रचंड दारू घेतली होती.
या प्रवासादरम्याने अनेकांना दारू पिऊन ट्रॅक्टर चालवू नका असं सांगूनही कोणी ऐकलं नाही. त्यामुळेच अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्या ट्रॅक्टरचा अपघात झाला त्यामध्ये असलेल्या प्रितीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ट्रॅक्टर चालकाला आम्ही सावकाश चालव म्हणून सांगत होतो. मात्र त्याने कुणाचेच ऐकले नाही. या प्रवासादरम्यान नाला आला आणि ट्रॅक्टरची ट्रॉली नाल्यात पलटी झाली.
हा अपघात इतका भयानक होता की, ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्यानंतर त्यातून कोणालाही उडी मारण्याची संधीही मिळाली नव्हती.
ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेल्या लोकांनी दारू कुठे प्याली असं विचारल्या वर मात्र त्यांनी सांगितले की, मुंडण करुन आम्ही सर्वजण घराकडे जात होतो.
त्यावेळी महामार्गावर दारुचे दुकान दिसले. त्यानंतर सगळ्या पुरुष मंडळीनी दारू प्याली होती. या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये 40 ते 50 जण प्रवास करत होते. मुंडण करण्याच्या कार्यक्रमातून परतत असताना हा अपघात झाला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची प्रकृतीची विचारपूस केली आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या अपघातात ठार झालेल्या नागरिकांच्या मृतदेहाव अंत्यसंस्कार करण्याचीही तयारी सुरू आहे. त्याचबरोबर परिसरातील लोकप्रतिनिधीही अपघातग्रस्त कुटुंबीयांना मदत करत आहेत.
तर त्याचवेळी दुसरी घटना आज पहाटे 3 वाजता घडली. विंध्याचलकडे जाणाऱ्या भाविकांच्या डंपरला एका ट्रकने मागून धडक दिली असून या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 9 जण जखमी आहेत.