Uttar Pradesh Corona Update : लखनऊमध्ये होम क्वारंटाईन पिता-पुत्राचा मृत्यू, आईच्या जीवाची तडफड, दार तोडून बाहेर काढलं

उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे (Lucknow Three Dead Bodies Found). त्याचबरोबर मृत्यूच्या आकडेवारीमुळे राजधानी लखनऊमधील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Uttar Pradesh Corona Update : लखनऊमध्ये होम क्वारंटाईन पिता-पुत्राचा मृत्यू, आईच्या जीवाची तडफड, दार तोडून बाहेर काढलं
deadbody
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 9:40 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे (Lucknow Three Dead Bodies Found). त्याचबरोबर मृत्यूच्या आकडेवारीमुळे राजधानी लखनऊमधील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लखनऊच्या स्मशानभूमीत असलेल्या लांबच लांब रांगांमुळे सरकारी आकडेवारीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकांना उपचार न मिळाल्यामुळे ते घरीच आपला जीव गमावत आहेत (Uttar Pradesh Lucknow Three Dead Bodies Found Who Are In Home Quarantine In Two Houses ).

दोघांचे मृतदेह घरात आढळले

ताज्या घटनेनुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या कृष्णा नगर पोलीस ठाण्याची आहे. कृष्णा नगरच्या एलडीए कॉलनीच्या सेक्टर सी -1 मधील एका घरात होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या 65 वर्षीय पिता अरविंद गोयल आणि 25 वर्षीय मुलगा इलू गोयल यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा शेजार्‍यांना घरातून वास आला, तेव्हा कळालं की घरात मृत्यू झाली आहे. स्तब्ध शेजार्‍यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस तिथे पोहोचल्यानंतर रहिवाशांनी बंदिस्त घराचं दार मोठा हातोडा मारुन तोडला. लोखंडी गेट उघडल्यानंतर आत दोन मृतदेह आढळले. तर 60 वर्षांची पत्नी रंजना गोयल खूपच गंभीर दिसत होत्या. त्यांची प्रकृतीही खूपच वाईट होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

महिलेची प्रकृतीही खराब होती

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तिघेही जण घरीच राहून उपचार घेत होते. अपंग असल्यामुळे महिला चालू शकत नव्हती. नवरा आणि मुलाच्या मृत्यूनंतर ती मोठ्याने ओरडली, पण तिचा आवाज घराबाहेर आला नाही. पोलिसांनी वडील-मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे, तर महिलेला उपचारासाठी लोकबंधू रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपूर्वी अरविंद गोयल हे घराच्या आत फिरताना दिसले होते, परंतु त्यानंतर ते दिसले नाहीत. कोरोनाच्या भीतीने, संपूर्ण परिसर ओसाड पडला आहे, ज्यामुळे कोणाचंही लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. कृष्णनगरचे पोलीस निरीक्षक म्हणाले की, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविषयी कोणतीही माहिती नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी पिता आणि मुलाच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचवेळी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

होमक्वारंटाईनमध्ये होते आई-वडील आणि मुलगा

कृष्णा नगरातील सेक्टर डी-1 मधील एका घराच्या आत आणखी एक मृतदेह सापडला. विवेक शर्मा असे मृताचे नाव आहे. शेजार्‍यांच्या म्हणण्यानुसार, विवेकलाही कोरोनाचा संसर्ग होता आणि त्याने स्वत: ला विलगीकरणात ठेवले होते. शेजार्‍यांनी विवेक शर्माच्या मृत्यूची माहिती कुशी नगरात राहणाऱ्या विवेकच्या नातेवाईकाला दिली होती. त्यानंतर त्या नातेवाईकाने पोलिस नियंत्रण कक्षामध्ये विवेक शर्माच्या मृत्यूची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांसह पालिकेची टीम बोलविण्यात आली आहे.

महापालिकेच्या पथकाने तेथून मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी पाठविला आहे. कृष्णा नगर पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, विवेकची बहीण बनारस येथे राहते आणि एक भाऊ कोलकाता येथे राहतो. दोघांनाही माहिती देण्यात आली आहे.

Uttar Pradesh Lucknow Three Dead Bodies Found Who Are In Home Quarantine In Two Houses

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | देशभरात 18 ते 44 वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरुवात, 84 हजार 599 लाभार्थ्यांना पहिला डोस, महाराष्ट्रात किती?

Fact Check : आगामी 10 दिवस खरंच विध्वंसक असणार ? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय ?

Coronavirus India : येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार; शास्त्रज्ञांचा अंदाज

गुजरातमधील कोव्हिड केअर सेंटरला भीषण आग, 18 जणांचा होरपळून मृत्यू

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.