लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव तापाने फणफणला, अवघ्या तीन दिवसात कोरोनाने मृत्यू

नवरदेवाला लग्नाच्या पहिल्या रात्रीच कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्याची वेळ आली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकाधिक बिघडतच गेली. (Newly Married Groom Dies Corona)

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव तापाने फणफणला, अवघ्या तीन दिवसात कोरोनाने मृत्यू
wedding
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 8:32 AM

लखनौ : कोरोनाची लागण झालेल्या नवरदेवाचा लग्नानंतर अवघ्या तीन दिवसात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नववधूच्या आनंदावर 72 तासांत विरजण पडले. लग्नाच्याच दिवशी तापाने फणफणल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. (Uttar Pradesh Newly Married Groom Dies within 72 hours of Wedding of Corona)

बिजनौर शहरातील मोहल्ला जाटान भागात राहणाऱ्या अर्जुनचा विवाह चांदपूरच्या कसबा स्याऊ भागात राहणाऱ्या बबलीसोबत 25 एप्रिल रोजी झाला होता. अर्जुनची वरात धूमधडाक्यात बबलीच्या माहेरी आली. तिथे दोघंही विधीवत विवाहबंधनात अडकले. संध्याकाळी सात वाजता वधूची पाठवणी झाली. बिजनौरमध्ये नवदाम्पत्याचं धूम धडाक्यात स्वागत करण्यात आलं.

‘सुहागरात’लाच नवरदेवाला ताप

लग्नाच्या रात्रीच अर्जुन तापाने फणफणला. ताप वाढत गेल्याने कुटुंबीय चिंतीत झाले. त्याला तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नवरदेवाला लग्नाच्या पहिल्या रात्रीच कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्याची वेळ आली. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकाधिक बिघडतच गेली.

रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू?

रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 29 एप्रिलच्या सकाळी अर्जुनचा मृत्यू झाल्याचा दावा शेजाऱ्यांनी केला. अर्जुनच्या मृत्यूमुळे कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली आहे. नवरदेवाच्या मृत्यूची बातमी नववधू आणि कुटुंबीयांना समजताच एकच सन्नाटा पसरला.

ज्या घरात काही काळापूर्वी हसण्या-खिदळण्याचं आणि आनंदाचं वातावरण होतं, तिथेच आक्रोश सुरु झाला. नवऱ्यासोबत सुखी संसाराची चित्र पाहणाऱ्या नववधूची स्वप्नं काही तासांतच विरली. बबलीची तब्येतही काही काळ बिघडली होती. कुटुंबातील इतरांचीही कोरोना चाचणी केली जात आहे.

लग्नाच्या दिवशीच कार अपघातात मृत्यू

ऐन लग्नाच्या दिवशीच अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात घडली होती. कार सजवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा गाडी विजेच्या खांबाला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

तुझ्या माहेरचे 24 जण अपघातात गेले, मुलीच्या डोक्यावर अक्षता पडताच बापाचा बांध फुटला

लग्नानंतर 24 तासात नववधूला वैधव्य, कार सजवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

लग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

(Uttar Pradesh Newly Married Groom Dies within 72 hours of Wedding of Corona)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.