नवी कोरी कार घेऊन पाच मित्र फिरायला गेले, पण एकच… त्यांच्यासोबत काय घडलं ?
नवी कार घ्यावी, असे अनेकांचे स्वप्न असते. अनेक जणा मेहनत करून, पै-पैसा जोडून एखादी शानदार कार घेतात आणि त्यातून फिरण्याची मजा लुटतात. उत्तर प्रदेशमध्येही एका तरूणाने अशीच मेहनत करून एक वॅगनॉर कार खरेदी केली. नवी कार आल्याने तो आणि त्यांच्या कुटंबातील सगळेच खूप खुश होते. त्याने तर त्याच्या मित्रांनाही कारखरेदीची गुड न्यूज दिली. पण नव्या कारचा हा आनंद अल्पकाळच टिकला.
लखनऊ | 24 जानेवारी 2024 : नवी कार घ्यावी, असे अनेकांचे स्वप्न असते. अनेक जणा मेहनत करून, पै-पैसा जोडून एखादी शानदार कार घेतात आणि त्यातून फिरण्याची मजा लुटतात. उत्तर प्रदेशमध्येही एका तरूणाने अशीच मेहनत करून एक वॅगनॉर कार खरेदी केली. नवी कार आल्याने तो आणि त्यांच्या कुटंबातील सगळेच खूप खुश होते. त्याने तर त्याच्या मित्रांनाही कारखरेदीची गुड न्यूज दिली. पण नव्या कारचा हा आनंद अल्पकाळच टिकला.
मित्रांनी बराच आग्रह केल्यानंतर तो तरूण मित्रांसह कारमधून फेरी मारण्यास बाहेर पडला. ते पाच जण होते, पण थोड्यावेळाने त्यांच्यापैकी फक्त एकच राहिला. असं काय झालं त्यांच्यासोबत ? हे पाचही जण गाडीमधून फेरफटका मारून परत येत होते, मात्र दाट धुक्यामुळे पुढचं काही नीट दिसलं नाही आणि त्यांची कार रामगंगा नदीवर बांधलेल्या बॅरेजचे रेलिंग तोडून खाली कोसळली. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी नदीची खोली सुमारे 35 फूट आहे. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकच जण वाचू शकला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने कार नदीतून बाहेर काढली.
धुक्यामुळे झाला अपघात
धुक्यामुळे नीट दिसत नव्हतं आणि वेगाने जाणारी ती कार नियंत्रणाबाहेर गेला आणि पाण्यात पडली. कारच्या खिडक्या उघडता न आल्याने आत बसलेल्या चार तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पण कारमधील एक तरूण कसाबसा काच फोडून बाहेर आला. आणि कारच्या वरती उभा राहून आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस आल्यावर इतरांनाही वाचवायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.
एक वाचला, चौघांचा मृत्यू
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहून तत्काळ पोलिसांना माहिती दिली. लोकांनीही तात्काळ नदीत उडी घेऊन कारमधील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केलामात्र, मोठ्या कष्टाने एका व्यक्तीला बाहेर काढता आले. उर्वरित चार जण वाहनात अडकून नदीत बुडून मरण पावले. रात्री 9 च्या सुमारास पोलिसांनी त्या कारसह सर्व मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मृतांची ओळख पटवून त्यांच्यां कुटुंबियांना याबाबत कळवण्यात आले. .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील दोन प्रवासी सिकंदर (20) आणि महरूफ (28) हे नूरपूर छिबरी येथील गावप्रमुख रऊफ अहमद यांचा मुलगा आहेत. त्यांच्यासोबत खुर्शीद (३८), अब्दुल रशीद (२३) आणि फैसल (२२) हे त्याच गावातील तीन तरुण होते. या अपघातात सिकंदर बचावला आहे, बाकी चौघांचाही मृत्यू झाला.
15 दिवसांपूर्वीच विकत घेतली होती कार
पोलिसांच्या सांगण्यानुसार, रऊफ अहमद यांनी 15 दिवसांपूर्वीच नवी कार खरेदी केली होती. त्यामध्ये बसून हे पाचही जण बाहेर गेले होते. मात्र येतानाच हा भीषण अपघात झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला. कार खरेदीचा आनंद क्षणात दु:खात बदलला. या अपघातात वाचलेल्या सिंकदर या तरूणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.