वर्गात केमिस्ट्रीचा तास सुरू होता, तेवढ्यात ‘तो’ धाडकन खाली कोसळला; 9 वी तील विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूने हादरली शाळा !

नेहमीप्रमाणे तो मुलगा शाळेत गेला. पण वर्गात तास सुरू असतानाच तो धाडकन खाली कोसळला तो उठलाच नाही. या आकस्मिक घटनेमुळे शाळा प्रशासनही हादरले. एवढ्या लहान मुलासोबत हा धक्कादायक प्रकार का घडला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वर्गात केमिस्ट्रीचा तास सुरू होता, तेवढ्यात 'तो' धाडकन खाली कोसळला; 9 वी तील विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूने हादरली शाळा !
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 12:21 PM

लखनऊ | 21 सप्टेंबर 2023 : शहरातील एका प्रतिष्ठित शाळेतील एका विद्यार्थ्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे (death of student) खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितनुसार, हा विद्यार्थी ९ व्या इयत्तेत शिकत होता. अचानक झालेल्या या मृत्यूने शाळा प्रशासनही (in school) हादरलं असून शहरात सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे. हार्ट ॲटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता प्रथमदर्शनी वर्तवण्यात आली. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण लखनऊमधील सिटी माँटेसरी स्कूल (अलीगंज ब्रांच) येथील असल्याचे समजते. तेथे ९व्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची तब्येत अचानत बिघडली. वर्गात शिक्षक शिकवत असतानाच तो बेशुद्ध झाला आणि खाली कोसळला. नक्की काय झालं हे आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना क्षणभर समजलंच नाही. मात्र प्रसंगावधान राखून शिक्षक आणि विद्यार्थी तेथे धावत गेले व त्याला उचलून टेबलवर ठेवले. पंप करण्याचाही प्रयत्न केला. शाळेत हजर असलेल्या नर्सलाही वर्गात तातडीने बोलावण्यात आले. तिने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले, मात्र रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शिक्षकांनी काय सांगितले ?

दरम्यान, वर्गात घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका शिक्षकाने सांगितले की, बुधवारी (20 सप्टेंबर) 9 वीत शिकणारा विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर विद्यार्थ्याला शुद्धीवर आणण्याचा, त्याल पंप करण्याचा प्रयत्न केला. त्याचे हात पायही दाबण्यात आले, त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण तो काही शुद्धीवर आलाचा नाही. उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले असता, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

कुटुंबियांनी केली चौकशीची मागणी

शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाच्या मृत्यूचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही, असे विद्यार्थ्याच्या मामाने सांगितले. त्याची तब्येत पूर्णपणे बरी होती. हा मृत्यू सामान्य असल्याचे अजिबात वाटत नाही. दुपारी १२ वाजता मुलाबद्दल ही माहिती मिळाली. त्याची तब्येत खराब आहे असं आधी सांगण्यात आलं. तर नंतर तो बेशुद्ध झाल्याचे कळवले. अखेर आपल्याला मुलाला रुग्णालयात हलवण्यात आल्याचे कळताच कुटुंबियांमध्ये घबराट पसरली.

मुलाच्या वडिलांनी सांगितली आपबीती

मृत विद्यार्थ्याच्या वडीलांनी आपबीती कथन केली. माझा मुलगा अलीगंज सीएमएस ब्रांचमध्ये शिकत होता.नेहमीप्रमाणे तो आजही शाळेत गेला. पण दुपारी १२ च्या सुमारास आम्हाल शाळेतून स्टाफचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुमचा मुलगा वर्गात बेशुद्ध झाला आहे, आम्ही त्याला रुग्णालयात नेत आहोत. ते ऐकताच आम्हीदेखील हॉस्पिटलमध्ये धाव घेतली, पण तोपर्यंत ते लोक तिथे पोहोचले. खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा श्वास सुरू नसल्याचे त्यांना आढळले, त्यांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.