Azam Khan | सपा खासदार आझम खान यांची प्रकृती बिघडली, तुरुंगातून मेदांता रुग्णालयात रवानगी

प्रकृती बिघडल्यानंतर आझम खान यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात आणण्यात आले. (Azam Khan COVID Positive)

Azam Khan | सपा खासदार आझम खान यांची प्रकृती बिघडली, तुरुंगातून मेदांता रुग्णालयात रवानगी
Azam Khan
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 8:22 AM

लखनौ : समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान (Azam Khan) यांना सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात कोरोना संसर्ग झाल्यानंतर प्रकृती ढासळल्याने आझम खान यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. आझम खान यांचा धाकटा मुलगाही कोरोनाग्रस्त असून त्यालाही मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Uttar Pradesh Samajwadi Party MP Azam Khan and son shifted to Hospital from Jail after testing COVID Positive)

आझम खान यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. खान यांच्यावर क्रिटिकल केअर टीम देखरेख करत आहे, अशी माहिती मेदांता हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ राकेश कपूर यांनी दिली. गेल्या आठवड्याभरापासून त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांना 4 लीटर ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याचं कपूर यांनी सांगितलं. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 90 च्या आसपास असून उपचार सुरु असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

बापलेक रुग्णालयात

आझम खान यांचा धाकटा मुलगा मोहम्मद अब्दुल्ला खान यालाही कोरोनाने ग्रासले आहे. मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यालाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रविवारी अचानक प्रकृती बिघडल्यानंतर आझम खान यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात आणण्यात आले.

हेही वाचा – तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलावंसं वाटतं, महिला खासदारावर आझम खान यांचं वक्तव्य

आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आझम खानसोबत तुरुंगात कैद आणखी 13 कैद्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं नुकतंच समोर आलं होतं. आझम खान तुरुंगातही रमझानचे रोजे ठेवत होता. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर आझम खानने रोजे ठेवणेही बंद केल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली. (Azam Khan COVID Positive)

बेताल वक्तव्यांसाठी कुख्यात

बेताल वक्तव्यांसाठी खासदार आझम खान कुप्रसिद्ध आहेत. लोकसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत असलेल्या भाजप खासदार रमा देवी (Rama Devi) यांना उद्देशून तुम्ही खुप सुंदर दिसता, तुम्ही एवढ्या सुंदर आहात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलावंसं वाटतं, असं वक्तव्य आझम खान यांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं. तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री जया प्रदा यांच्यावरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

राजदच्या माजी खासदाराचे निधन

राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन (Mohammad Shahabuddin) याचेही गेल्याच आठवड्यात निधन झाले. दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. बिहारचा बाहुबली नेता अशी ओळख असलेला मोहम्मद शाहबुद्दीन तिहार जेलमध्ये हत्या प्रकरणात शिक्षा भोगत होता.

संबंधित बातम्या :

Mohammad Shahabuddin | तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या माजी खासदाराचा कोरोनाने मृत्यू

Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं, एम्सचं स्पष्टीकरण

(Uttar Pradesh Samajwadi Party MP Azam Khan and son shifted to Hospital from Jail after testing COVID Positive)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.