लखनऊ : मागच्या काही दिवसांपासून SDM अधिकारी ज्योती मौर्य चर्चेत आहेत. ज्योती मौर्य यांच्यावर त्यांच्या नवऱ्यानेच गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर मी बायकोला शिकवलं, मोठं केलं. पण SDM अधिकारी बनल्यानंतर तिने मला धोका दिला. मनीष दुबेसोबत अफेअर सुरु केलं, असा आरोप ज्योती यांचा नवरा आलोक मौर्यने केलाय. दोघांना मी रंगेहाथ पकडलं. हॉटेलमध्ये दोघांनी अनेक रात्री एकत्र घालवल्यात, असा आरोप आलोकने केला.
या सगळ्या आरोपांवर ज्योती मौर्य मागच्या काही दिवसांपासून मौन धारण करुन होत्या. आता या सगळ्यावर त्या व्यक्त झाल्या आहेत. एक इंटरव्यूमध्ये त्यांनी आलोकवर पलटवार केला. त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ज्योती मौर्यने नवऱ्यावर काय आरोप केले?
आलोकने माझं व्हॉट्स APP अकाऊंट हॅक केलं. त्यानंतर कॉम्प्रोमाइज करण्यासाठी ऑफर सुद्धा दिली, असा ज्योती मौर्य यांनी आरोप केला आहे. त्यांनी आपल्या मुलांबद्दल तसेच प्रियकर मनीष दुबेबद्दलही वक्तव्य केलं आहे. ज्योती मौर्य यांनी दैनिक भास्करला मुलाखत दिली आहे. “आलोकने 10 महिने माझं व्हॉट्स APP अकाऊंट हॅक केलं होतं. या संदर्भात मी प्रयागराजच्या धूमनगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. आलोकचे कुटुंबीय माझ्याकडून पैसा, घर आणि कारची मागणी करत होते” असं ज्योती मौर्य यांनी म्हटलं आहे.
आलोकच्या कुटुंबाने ज्योतीकडे काय मागणी केलीय?
“माझ्या लग्नाला 7 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. त्यामुळे हुंड्यासाठी छळाच्या कलमातून त्यांची सुटका होईल. माझ्याकडे 50 लाख रुपये, कार आणि घर मागितल्याचा मी आरोप केलाय” असं ज्योती मौर्य म्हणाल्या.
प्रियकराबद्दल ज्योती मौर्य काय म्हणाल्या?
प्रियकर मनीष दुबेबद्दलही ज्योती मौर्य यांनी भाष्य केलय. “मी मनीषसोबत खुश आहे. मला त्याच्यासोबत आयुष्यात पुढे जायचं आहे. मनीषला आता मुलं नाहीय. त्याचं प्रकरण फॅमिली कोर्टात आहे. जर एखाद्याला कोणासोबत आयुष्यात पुढे जायचं असेल, तर त्यात वाईट काय?” असा सवालही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी आलोकने आपल्याला कॉम्प्रोमाइजची ऑफर दिली होती, असा आरोपही ज्योती यांनी केला. तो घर आणि 50 लाख रुपयांची मागणी करत होता, असं ज्योती यांचं म्हणणं आहे.
ज्योतीसोबत अफेअर असलेल्या मनीष दुबेवर सुद्धा कठोर कारवाई होऊ शकते. उत्तर प्रदेश डीजी होमगार्ड विजय कुमार मौर्य यांनी मनीष दुबेला निलंबित करुन विभागीय चौकशीची शिफारस केली आहे.