Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, त्रिवेंद्र सिंह रावत थेट जे.पी. नड्डांच्या भेटीला

त्रिवेंद्र सिंह हे एक मजबूत मुख्यमंत्री आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मुन्नासिंग चौहान यांनी दिली. (Uttarakhand CM Trivendra Singh Rawat Meet J.P. Nadda)

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, त्रिवेंद्र सिंह रावत थेट जे.पी. नड्डांच्या भेटीला
CM-Trivendra-singh-rawat-and-Amit-Shah
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 12:50 PM

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या राजकारणात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. तर काल (सोमवारी) भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक पार पडली. त्याशिवाय आज देहरादूनमध्ये उत्तराखंड विधीमंडळ गटनेत्यांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. यासाठी सर्व आमदारांना देहरादून या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील सर्व भाजप आमदारांना ही माहिती देण्यात आली आहे. (Uttarakhand CM Trivendra Singh Rawat Meet J.P. Nadda)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाबाबत संसदेत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. यानंतर संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह हे एक मजबूत मुख्यमंत्री आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मुन्नासिंग चौहान यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांबाबत भाजपच्या आमदारांमध्ये कोणताही संताप नाही. संसदीय मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर पक्षात कोणताही निर्णय घेण्यात येतो. मात्र त्रिवेंद्र सिंह आणि जेपी नड्डा यांच्यात कोणती संभाषणे झाली हे मला माहिती नाही, असे मुन्नासिंग चौहान म्हणाले.

भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक

दरम्यान सोमवारी अचानक भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय पर्यवेक्षकाच्या रुपात पक्षाचे उपाध्यक्ष आणि उत्तराखंडचे प्रभारी दुष्यंत गौतम उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत नेतृत्व बदलाच्या विषयावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. (Uttarakhand CM Trivendra Singh Rawat Meet J.P. Nadda)

त्रिवेंद्र सिंहांनाही बैठकीची कल्पना नाही!

उत्तराखंड कोअर कमिटीची झालेली बैठक ही पूर्व नियोजित नव्हती. अशावेळी अचानकपणे झालेली ही बैठक राज्यातील राजकारण तापवणारी ठरली आहे. भाजपची ही बैठक राजधानी गॅरसॅन इथं पार पडली. मुख्यमंत्री रावत यांनाही या बैठकीबाबत कल्पना नव्हती, असं सांगण्यात येत आहे.

त्रिवेंद्र सिंह रावतांच्या जागी कुणाला संधी ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये नेतृत्व बदलाच्या वेगवान हालचाली घडत आहेत. अशावेळी रावत यांच्या जागी धन सिंह रावत किंवा सतपाल महाराज यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं कळतंय. या दोन नावांबाबत सर्व आमदारांच्या सहमतीवर काम सुरु आहे. जर या दोन्ही नावांवर एकमत झालं नाही तर केद्र सरकारकडून नैनीतालचे लोकसभा खासदार अजय भट्ट आणि राज्यसभा खासदार अनिल बलूनी यांचं नाव पुढे केलं जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (Uttarakhand CM Trivendra Singh Rawat Meet J.P. Nadda)

संबंधित बातम्या : 

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, त्रिवेंद्र सिंह रावतांच्या जागी कुणाला संधी ?

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढवता येईल का?; मराठा आरक्षणप्रश्नी सर्व राज्यांना नोटीस

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.