Video : आणि मृत्यूच्या दाढेतून तो सहीसलामात सुटला, ITBP चे जवान देवदूत ठरले, पाहा तो क्षण व्हिडीओतून

मृत्यूचं तांडव झालेलं असतानाच काही जणांचं मात्र दैव बलवत्तर म्हणून जीव वाचलेला दिसतो आहे. (Uttarakhand Joshimath Dam rescue one person)

Video : आणि मृत्यूच्या दाढेतून तो सहीसलामात सुटला, ITBP चे जवान देवदूत ठरले, पाहा तो क्षण व्हिडीओतून
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 6:48 PM

उत्तराखंड:  देव तारी त्याला कोण मारी. देवभूमी उत्तराखंडमध्ये आज पुन्हा एकदा हिमकडा कोसळून हाहाकार माजला आहे. मृत्यूचं तांडव झालेलं असतानाच काही जणांचं मात्र दैव बलवत्तर म्हणून जीव वाचलेला दिसतो आहे. त्यातच आपल्या ITBP जवानांनी एकाला जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवलय. तपोवन डॅमच्या जवळ एका टनेलमध्ये नदीतून वाहून आलेल्या गाळात एक जण गाडला गेलेला होता. त्याला सहीसलामत बाहेर काढण्यात यश आलं. जसाही तो मृत्यूच्या कवेतून बाहेर आला त्यावेळेस त्याचा आनंद पहाण्यासारखा होता. तो क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जसं तांडवाचा क्षण कैद झाला तसा हा जीवंतपणाची आशा घेऊन आलेलाही झाला आहे. (Uttarakhand Joshimath Dam ITBP personnel rescue one person who trapped in tunnel)

नेमकं काय घडलं? 

उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

गावंच्या गावे वाहून गेली?

मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. त्यामुळे धरणाजवळची अनेक गावं या पुरात वाहून गेली आहेत. तसेच माणसे, गुरेढोरेही वाहून गेली असून शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या ठिकाणी प्रशासानाचे कर्मचारी आणि रेस्क्यु ऑपरेशन टीम पोहोचली असून युद्धपातळीवर रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे. (Uttarakhand Joshimath Dam ITBP personnel rescue one person who trapped in tunnel)

संबंधित बातम्या : 

Uttarakhand Chamoli Glacier burst LIVE: 150 जण बेपत्ता, 10 मृतदेह हाती, बचावकार्य सुरु

Glacier meaning : महापुरामुळे विनाश घडवणारा हिमकडा म्हणजे काय? उत्तराखंडापासून हरिद्वारपर्यंत अलर्ट कशासाठी?

Uttarakhand Joshimath Dam: देवभूमीतील प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले; अमित शहांकडून मदतीचं आश्वासन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.