Uttarkashi Tunnel Collapse | सहा दिवसांपासून बोगद्यात कसे रहात आहेत मजूर ? लवकर बाहेर नाही काढले तर हा धोका

बोगद्याच्या आत आतापर्यंत सर्व मजूर सुरक्षित आहेत. त्यांना वेळोवेळी मदत, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांशी मजूरांना बोलायला दिले जात आहे. परंतू वाढत्या थंडीमुळे तसेच अन्य कारणामुळे जर मजूरांना लवकर बाहेर काढले नाहीत तर त्यांच्या जीवावर बेतू शकते असे म्हटले जात आहे.

Uttarkashi Tunnel Collapse | सहा दिवसांपासून बोगद्यात कसे रहात आहेत मजूर ? लवकर बाहेर नाही काढले तर हा धोका
TUNNEL UTTARKASHIImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 7:22 PM

उत्तराखंड | 17 नोव्हेंबर 2023 : उत्तराखंड येथील उत्तरकाशी ऐनदिवाळीत बोगद्यात भूस्खलन होऊन 40 मजूर गेल्या सहा दिवसांपासून अडकले आहेत. रविवारी पहाटे घडलेल्या दुर्घटनेनंतर मजूरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. परंतू अद्याप या प्रयत्नांना कोणतेही यश आलेले नाही. अत्याधुनिक ड्रीलींग मशीन मागवून खोदकाम सुरु असून आतापर्यंत केवळ 24 मीटरपर्यंत ड्रीलींगचे काम झाले आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून या मजूरांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरुच आहे. बोगद्यातील लोखंडी सळ्यांमुळे खोदकामाला विलंब होत आहे. जर या मजूरांना लवकर बाहेर न काढले तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. दरम्यान,मजूरांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे.

ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगांव दरम्यान महामार्गाचे काम सुरु आहे. येथील बोगद्याचे काम नवयुगा कंपनी करीत असताना अचानक बोगद्यातच भूस्खंलन होऊन 50 मीटर बोगद्याचा भाग कोसळल्याची घटना ऐन दिवाळीत 11 नोव्हेंबर रोजीच्या पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे आत काम करणारे 40 मजूर आतमध्येच अडकले आहेत. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी हेव्ही ड्रीलिंग मशिनद्वारे खोदकाम सुरु आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि मेडीकल टीम आणि अन्य आपात्कालिन संस्था या कामात जुंपल्या आहेत. या मजूरांना पाईपद्वारे ऑक्सिजन तसेच अन्नाची पाकिटे पाठवली जात आहेत.

सर्व मजूर सुरक्षित

बोगद्याच्या आत आतापर्यंत सर्व मजूर सुरक्षित आहेत. त्यांना वेळोवेळी मदत, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांशी मजूरांना बोलायला दिले जात आहे. आतमध्ये अडकलेल्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी आतापर्यंत 24 मीटरपर्यंत खणण्यात आले आहे. मात्र, वरून कोसळलेला माती आणि खडकांचा ढीगारा मोठा  60 मीटर इतका मोठा आहे.

कसा धोका वाढणार ?

जर लवकर रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले नाही तर या मजूरांना अडचणी निर्माण होतील. सातत्याने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मजूर बेशुद्ध पडू शकतात. जेवणाच्या कमतरतेने त्यांना तब्येत बिघडू शकते. मानसिकदृष्ट्या त्यांचे धैर्य खचू शकते. वीज प्रवाह, वाढती थंडी यामुळे हायपोथर्मिया सारखी लक्षणे जाणवू शकतात. या मजूरांकडे आत जनरेटर होता त्याचे डीझेल संपत आल्याने आत अंधार पसरू शकतो. त्यामुळे आणखी अडचणीत भर पडणार आहे.

मजरांचे नातेवाईक नाराज

या मजरांचे नातेवाईक सरकारवर नाराज झाले आहेत. अधिकारी येत जात आहेत. परंतू तरीही रेस्क्यू ऑपरेशन काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीए..मजूरांच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला आहे. आता थोडेथोडके दिवस नव्हे तर सहा दिवस आमच्या घरातील कर्ते पुरुष आत अडकले आहेत. अजूनही त्यांच्या बाहेर पडण्याची खात्रीलायक वेळ सांगितली जात नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. काही अधिकाऱ्यांशी मजूरांच्या नातेवाईकांचे भांडणही झाले आहे.

Non Stop LIVE Update
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा.
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?.
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा.
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम.
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली.
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा.
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.