Vande Bharat Express | नवीन वंदेभारत एक्सप्रेसमध्ये 25 सुधारणा केल्या, नेमक्या काय आहेत या सुविधा पाहा

vande bharat express : वंदेभारतमुळे प्रवाशांचा प्रवास करण्याचा संपूर्ण अनुभव बदलून टाकला आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांच्या वेळेत साधारण एक ते दीड तासांची बचत होत आहे. या ट्रेनचा स्लीपर कोच लवकरच येत आहे. प्रवाशांच्या सूचनेनूसार आता अनेक बदल केले आहेत.

Vande Bharat Express | नवीन वंदेभारत एक्सप्रेसमध्ये 25 सुधारणा केल्या, नेमक्या काय आहेत या सुविधा पाहा
VANDE BHARAT EXPRESSImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 4:41 PM

मुंबई | 25 जुलै 2023 : वंदेभारत एक्सप्रेस आता 25 नवीन बदलांसह प्रवाशांच्या दिमतीला हजर होत आहे. यातील काही बदल हे थेट प्रवाशांच्या सोयी संबंधीत आहेत. तर काही बदल हे तांत्रिक आणि सुरक्षेशी संबंधीत असणार आहेत. भारतीय रेल्वे नेटवर्कवरील वंदेभारत ही पहिली आधुनिक आणि आरामदायी वेगवान ट्रेन असून तिच्यात विमानप्रवाशांना आपल्याकडे खेचण्याची क्षमता आहे. तर नेमके काय बदल केले आहेत. वंदेभारत आता प्रवाशांची सुख सुविधा  कशी वाढविणार आहे ते पाहूया…

सध्याच्या घडीला देशातील 25 मार्गांवर 50 वंदेभारत धावत आहेत. वंदेभारतमुळे प्रवाशांचा प्रवास करण्याचा संपूर्ण अनुभव बदलून टाकला आहे. या ट्रेन प्रवाशांच्या वेळेत साधारण एक तासांची बचत होत आहे. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण जेथे शंभर टक्के झाले आहे. त्याच मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. आता वंदेभारतची शयनयान श्रेणी लवकरच तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे लांबचा प्रवासही आरामदायी होणार आहे.

स्लिपर कोच तयार होणार 

वंदेभारतच्या स्लिपर कोचच्या आवृत्तीसाठी 120 स्लिपर कोच तयार करण्यासाठी रशियन कंपनी TMH आणि भारतीय कंपनी रेल विकास निगम लिमिटेड RVNL यांना संयुक्तपणे कंत्राट दिले आहे. तर 80 वंदेभारत स्लिपर BHEL – Titagarh तयार करणार आहेत. तर एल्युमिनियमची वंदेभारतही तयार केली जात आहे. वंदेभारतच्या प्रवाशांच्या सूचनेनूसार 25 बदल केले आहेत. त्यातील काही प्रमुख बदल खालील प्रमाणे आहेत.

वंदेभारत एक्सप्रेसमध्ये झालेले बदल पाहा 

1 ) आसनाच्या बैठकीचा एंगल बदलत ती अधिक आरामदायी केली आहे.

2) चेअर कारच्या आसनांचे कुशन अधिक मऊ करण्यात आले आहेत.

3) वॉश बेसिनची खोली अधिक वाढविली आहे. त्यामुळे पाणी आता खाली सांडणार नाही.

4) आसनाखाली मोबाईल चार्जर पॉईंटची दिशा बदलली आहे. आता ते सहज सापडेल

5) एक्झुकेटिव्ह चेअरकारमधील आसनाचा कलर आता लाल एवजी प्लेझंट ब्ल्यू असणार आहे.

6) एक्झुकेटिव्ह चेअरकारमधील आसनातील फूट रेस्टचा आकार वाढविला आहे. ते अधिक आरामदायी केलेत.

7) ड्रायव्हींग ट्रेलर कोचमध्ये असलेल्या दिव्यांग अपंग प्रवाशांच्या व्हीलचेअरची व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

8 ) शौचालयातील प्रकाश व्यवस्था सुधारली आहे. 1.5 वॅट ऐवजी आता 2.5 वॅटचे दिवे बसविण्यात आले आहेत.

9 ) पाण्याच्या नळाला चांगला फ्लो येण्यासाठी दुरुस्ती केली आहे.

10 ) एक्झुकेटिव्ह चेअरकारमधील मागील आसनामधील मॅगझिन बॅग बसविली आहे.

11 ) टॉयलेट हॅण्डला अधिक ग्रिप वाढविण्यासाठी त्याला जरा आणखी बेंड दिला आहे.

12 ) आपात्कालिन स्थितील हॅमर बॉक्स पटकण नजरेत येण्यासाठी त्याची रचना बदलली आहे.

13 ) आपात्कालिन परिस्थिती ड्रायव्हरशी संवादासाठी असलेली टॉक बॅक यंत्रणा पॅनल बॅकग्राऊंडशी मॅच केली आहे.

14 ) लगेज रॅक लाइट्ससाठी स्मूथ टच कंट्रोल्स, आधीचा रेझिस्टिव्ह टचवरून कॅपेसिटिव्ह टचमध्ये बदल केला आहे.

15 ) अग्निशामक यंत्रणेचे डोअर पारदर्शक केले आहेत. जेणे करून आपात्कालिन स्थितीत अग्निशमन उपकरण लवकर निदर्शनात येतील.

16 ) अपर ट्रीम पॅनलमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे त्याचे सौदर्य वाढून ते मजबूत झाले आहे.

17 ) उत्तम दृश्यमानता आणि सौंदर्यासाठी ड्रायव्हिंग ट्रेलर कोचमध्ये एकसमान रंगसंगती

18 ) निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रदेशात ओएचई उंचावर असेल तेथे हायराईस पेंटोग्राफचा वापर केला जाईल.

19 ) ट्रेलर कोचेसमधील हॅच डोअर ईलेक्ट्रीकल मेन्टेनन्ससाठी अधिक सोयीस्कर केले.

20 ) ड्रायव्हर कंट्रोल पॅनलमधील इमर्जन्सी स्टॉप पुश बटणाची स्वरुप बदलत आता ते लोको पायलटच्या सोयीचे केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.