Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घ्या… म्हशींनी वंदे भारत एक्सप्रेसचं नाक फोडलं, आता मालकाच्या विरोधात…

कालच्या अपघातानंतर ट्रेनचं इंजिन पूर्णपणे दुरूस्त करण्यात आल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. म्हशींच्या धक्क्याने ट्रेन कशी फुटू शकते, असा प्रश्न काल उपस्थित केला गेला.

घ्या... म्हशींनी वंदे भारत एक्सप्रेसचं नाक फोडलं, आता मालकाच्या विरोधात...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 2:24 PM

मुंबईः मुंबईहून अहमदाबादकडे (Mumbai Ahmedabad) जाणाऱ्या वंदे भारत सेमी हाय स्पीड एक्सप्रेसला (Vande Bharat Express) गुरुवारी सकाळी अपघात झाला. हा अपघात खूपच विचित्र होता. वटवा आणि मणिनगर स्टेशनदरम्यान काही म्हशींनी ट्रेनला धडक दिली. यामुळे ट्रेनच्या इंजिनाचा (Engine) काही भाग फुटला. रेल्वेपटरी आणि स्टेशनच्या परिसरात जनावरांना आणण्यास मनाई असताना या म्हशी थेट ट्रेनवर येऊ धडकल्या. यामुळे आता म्हशींच्या मालकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलंय.

या अपघातात इंजिनाच्या मडगाडचा समोरील अर्धा भाग फुटला. म्हशींची जोरदार धडक बसली. यात चार म्हशी जागीच ठार झाल्या. पण आता रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफने म्हशींच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वटवा रेल्वे स्टेशनवरील आरपीएफ इन्सपेक्टर प्रदीप शर्मा म्हणाले, रेल्वे अधिनियम 1989 मधील 147 कलमानुसार, एफआयआर दाखल करण्यात आलंय. रेल्वेच्या कोणत्याही भागात अनधिकृत प्रवेश आणि रेल्वेच्या संपत्तीचा दुरुपयोह करण्यासंबंधी हे कलम आहे.

या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झालाय. गुरुवारी या प्रकरणी FIR दाखल करण्यात आलाय. दरम्यान, रेल्वे पोलिसांना म्हशींच्या मालकाचा शोध अद्याप लागलेला नाही.

अहमदाबाद रेल्वे पीआरओ यांनी सांगितलं की सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

इंजिनाचा काही भाग तुटून पडल्यामुळे तो परत दुरूस्त करण्यासाठी  20 मिनिटं लागले. त्यानंतर ट्रेन मार्गस्थ झाली.

याच वंदे भारत एक्सप्रेसचं  30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं. ही ट्रेन ताशी 180 ते 200 किमी एवढ्या वेगाने धावते.

दरम्यान, कालच्या अपघातानंतर ट्रेनचं इंजिन पूर्णपणे दुरूस्त करण्यात आल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. म्हशींच्या धक्क्याने ट्रेन कशी फुटू शकते, असा प्रश्न काल उपस्थित केला गेला. मात्र हा भाग कॉस्मेटिक असल्याचं सांगण्यात आलं. तो पूर्णपणे बदलून नवा लावण्यात आला.

घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.