कश्मीरात धावणार वंदेभारत, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी लोकार्पणाची शक्यता, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचेही उद्घाटन
उद्घाटनाच्या वेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित राहतील.

काश्मीर उर्वरित देशाशी रेल्वे मार्गाने जोडले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी कटरा येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस सध्या काही काळ कटरा येथून धावणार आहे. कारण जम्मू रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. उधमपूरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. याप्रसंगी जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरला येत आहेत. त्याचे लँडिंग उधमपूरमध्ये होईल. यानंतर ते जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पाहणी करतील आणि त्याचे उद्घाटन करतील.नंतर मोदी कटरा येथे पोहोचतील आणि वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
काही लोक प्रश्न उपस्थित करत आहेत की वंदे भारत ट्रेन कटराहून श्रीनगरला का जात आहे?’ पण सत्य हे आहे की ही ट्रेन जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस आहे. सध्या, जम्मू रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने काही महिने ट्रेन कटरा येथून चालवविले जात आहे.ऑगस्टच्या सुमारास हे काम पूर्ण झाल्यावर ही ट्रेन जम्मूहून नियमितपणे धावेल असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
कश्मीरमध्ये ट्रेन पोहचायला ५० वर्षे वाट पहावी लागली
२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी कटरा रेल्वे स्टेशन राष्ट्राला समर्पित केले होते. पहिली ट्रेन १९७२ मध्ये जम्मूला पोहोचली असली तरी, कश्मीरमध्ये ट्रेन पोहचविण्यासाठी आपल्याला ५० वर्षे वाट पहावी लागली. आता आपल्याला ही सुविधा मिळणार आहे आणि मला विश्वास आहे की ही केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक कामगिरी असेल असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.