या 10 बाबी वंदेभारत स्लीपर ट्रेनला राजधानी एक्सप्रेस पेक्षा श्रेष्ट बनवतात

वंदेभारत स्लीपर कोचच्या प्रोटोटाईपची चाचणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. या वंदेभारत स्लीपर एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेसची जागा घेणार आहेत.

या 10 बाबी वंदेभारत स्लीपर ट्रेनला राजधानी एक्सप्रेस पेक्षा श्रेष्ट बनवतात
vande bharat sleeper pic
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 7:40 PM

भारतीय रेल्वे लोकप्रिय वंदेभारत एक्सप्रेसच्या स्लीपर कोच प्रोटोटाईपची नोव्हेंबरमध्ये चाचणी करणार आहे. या नवीन स्लीपर कोचमुळे रात्रीचा प्रवास अत्यंत आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. ही वंदेभारत स्लीपर कोच ट्रेन राजधानी एक्सप्रेस या लक्झरी ट्रेन पेक्षाही अधिक आरामदायी आणि आलिशान का आहे याची दहा मुद्द्यात पडताळणी करु या ?

वंदेभारत स्लीपर कोचची दहा हटके वैशिष्ट्ये –

1 – वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनचा वेग दर ताशी 160 किमी इतका वाढू शकतो. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. तसेच या ट्रेनच्या प्रवासात बसणारे हादरे देखील कमी होणार आहेत.

2 – या नवीन वंदे भारत स्लीपर कोचच्या डब्यातील आसने आरामदायी कुशनच्या गादीचे असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आरामात झोपता येणार आहे, तसेच अपर आणि मिडल बर्थला जाण्यासाठी शिड्या अधिक चांगल्या पुरविण्यात आल्या आहेत.

3 – राजधानी एक्सप्रेसला स्वतंत्र इंजिन लावावे लागते. परंतू वंदेभारत एक्सप्रेस इंजिन लेस ट्रेन असून दोन्ही बाजून मेट्रो प्रमाण ड्रायव्हरच्या केबिन असल्याने इंजिन लावण्याचा आणि काढण्याच्या वेळेत बचत होणार आहे.

4 – या ट्रेनचा मधला गॅंगवे संपूर्ण पॅकबंद असल्याने बाहेरुन डब्यात कोणतीही धुळ येणार नाही. त्यामुळे डस्ट फ्री प्रवासाचा आरोग्यदायी आनंदे घेता येणार आहे.

5 – साईड वॉल,रुफ,एण्ड वॉल, फ्लोअर शिट्स, आणि कॅब अथेन्स्टीक स्टीलपासून बनलेले आहेत. त्यामुळे त्यांची मजबूती आणि सुरक्षा वाढलेली आहे.

6 – या ट्रेनचे दरवाजे स्वयंचलित असल्याने धावती ट्रेन पकडण्यासारखे जीव धोक्यात घालणारे प्रकार बंद होतील,दोन डब्यातील दरवाजे देखील स्वयंचलित असतील.

7 – वंदेभारत स्लीपर कोचमध्ये बायो व्हॅक्युम टॉयलेट यंत्रणा आहे.तसेच फर्स्टक्लास एसी कोचमध्ये शॉवर बाथची देखील सुविधा आहे.

8 – या ट्रेनचे डबे अपघातापासून सुरक्षित असून अग्निशमन यंत्रणा देखील अत्याधुनिक आहे. यात फायर बॅरियर वॉलची सुविधा देण्यात आली आहे.

9 – वंदेभारत स्लीपर कोच एक्सप्रेसचे डबे स्मुथ आणि जंर्क फ्री आहे. त्यामुळे प्रवासात प्रवाशांना जराही धक्के बसणार नाहीत.

10 – ट्रेनचे कपलर अत्यंत सुरक्षित आहेत. आगीपासून ही ट्रेन अधिक सुरक्षित आहे. या ट्रेनला 16 डबे आहेत. एक एसी फर्स्टक्लास कोच, चार एसी-2 टीयर कोचेस आणि अकरा एसी 3 टीयर कोचेस असे 16 डबे आहेत. 823 प्रवासी यात सामावतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.