Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भिकारी दाखवा, एक हजार मिळवा..’ हे शहर होणार देशातील पहिले भिकारी मुक्त शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तर प्रदेशातील वाराणसी हा मतदार संघ एका अनोख्या उपक्रमामुळे चर्चेत आला आहे. या ठिकाणी आता तुम्हाला भिकारी दिसणार नाहीत. येथील भिकाऱ्यांना पकडून आणणाऱ्यांना एक हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

'भिकारी दाखवा, एक हजार मिळवा..' हे शहर होणार देशातील पहिले भिकारी मुक्त शहर
varanasi Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 10:05 PM

वाराणसी | 4 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेले धार्मिक तिर्थक्षेत्र वाराणसी येत्या तीन देशातील पहिले भिक्षामुक्त शहर होणार आहे. या मोहीमेचा सुरुवात वाराणसी स्थित स्टार्टअप बेगर्स कॉर्पोरेशन म्हणजे भिकारी महामंडळाने केली आहे. भिक्षेकऱ्यांना रोजगार देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे उघडण्याची तयारी केली आहे. भिकाऱ्यांना जो कोणी येथे रोजगारासाठी आणेल त्या नागरिकांना कॉर्पोरेशन रोख पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बेगर्स कॉर्पोरेशनचे संस्थापक चंद्र मिश्रा यांनी या नाविण्यपूर्ण उपक्रमा माहीती देताना सांगितले की बनारस येथे सुमारे सहा हजार भिकारी आहेत. यात 1400 लहान मुलांचा समावेश आहे. कुटुंबा किंवा लहान मुलांसोबत रहाणाऱ्या 18 ते 40 वर्षांच्या शारीरिक रुपाने सक्षम भिकाऱ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना कॉटनच्या बॅगा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच फुलांची आणि पुजाविधीची दुकाने सुरु करण्यास मदत करण्याचा उपक्रम नव्या वर्षा सुरु होणार आहे.

एप्रिल 2024 मध्ये 50 भिकारी कुटुंबापासून सुरुवात करण्यात येऊन मार्च 2027 पर्यंत सहा टप्प्यामध्ये एक हजार भिक्षेकरी कुटुंबाना रोजगार पुरविण्याची योजना आहे. सध्या या कार्पोरेशनने 17 भिक्षेकरी कुटुंबाना या भिक मागण्याच्या सवयीपासून दूर केले आहे. ते वेगवेगळ्या व्यवसायात स्वाभीमानाने कष्ठ करुन जगत आहेत. यापैकी काहींनी तर उद्योग प्रशिक्षणादरम्यान महिन्याकाठी 12 हजाराची कमाई केली आहे.

भिकाऱ्यांना मिळणार हिस्सेदारी

बेगर्स कॉर्पोरेशन ही अशी पहिली कंपनी आहे जी भिकाऱ्यांना कंपनीत हिस्सेदारी देणार आहे. कॉर्पोरेशन भिकाऱ्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये आणि तीन वर्षांनंतर एक लाख रुपयांची किमान अर्थसहाय्य देण्यासाठी त्यांच्या सोबत करार करणार आहे. भिकाऱ्यांशी करार केल्याने त्यांना तीन वर्षांत किमान 4.6 लाख रुपये मिळणार आहे.

भिकाऱ्याला भिक देण्याऐवजी येथे आणा

भिकाऱ्यांना भिक देण्याऐवजी त्यांना येथे आणा आणि एक हजार रुपयांचे बक्षिस मिळवा असे आवाहन बेगर्स कॉर्पोरेशनने लोकांना केले आहे. कॉर्पोरेशनने सरकार आणि प्रशासनाला सर्वेक्षण करुन खऱ्या भिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी केली आहे. बेगर्स कॉर्पोरेशनने अण्णा आणि माला या दोन भिकाऱ्यांचा कायापालट कसा झाला हे सांगितले आहे. आधी भिकेवर गुजराण करणारे हे आता केवळ सन्मानजनक जीवनच जगत नसून आपल्या कुटुंबाचा आधार बनले आहेत.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.