वाराणसी | 4 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेले धार्मिक तिर्थक्षेत्र वाराणसी येत्या तीन देशातील पहिले भिक्षामुक्त शहर होणार आहे. या मोहीमेचा सुरुवात वाराणसी स्थित स्टार्टअप बेगर्स कॉर्पोरेशन म्हणजे भिकारी महामंडळाने केली आहे. भिक्षेकऱ्यांना रोजगार देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे उघडण्याची तयारी केली आहे. भिकाऱ्यांना जो कोणी येथे रोजगारासाठी आणेल त्या नागरिकांना कॉर्पोरेशन रोख पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बेगर्स कॉर्पोरेशनचे संस्थापक चंद्र मिश्रा यांनी या नाविण्यपूर्ण उपक्रमा माहीती देताना सांगितले की बनारस येथे सुमारे सहा हजार भिकारी आहेत. यात 1400 लहान मुलांचा समावेश आहे. कुटुंबा किंवा लहान मुलांसोबत रहाणाऱ्या 18 ते 40 वर्षांच्या शारीरिक रुपाने सक्षम भिकाऱ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना कॉटनच्या बॅगा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच फुलांची आणि पुजाविधीची दुकाने सुरु करण्यास मदत करण्याचा उपक्रम नव्या वर्षा सुरु होणार आहे.
एप्रिल 2024 मध्ये 50 भिकारी कुटुंबापासून सुरुवात करण्यात येऊन मार्च 2027 पर्यंत सहा टप्प्यामध्ये एक हजार भिक्षेकरी कुटुंबाना रोजगार पुरविण्याची योजना आहे. सध्या या कार्पोरेशनने 17 भिक्षेकरी कुटुंबाना या भिक मागण्याच्या सवयीपासून दूर केले आहे. ते वेगवेगळ्या व्यवसायात स्वाभीमानाने कष्ठ करुन जगत आहेत. यापैकी काहींनी तर उद्योग प्रशिक्षणादरम्यान महिन्याकाठी 12 हजाराची कमाई केली आहे.
बेगर्स कॉर्पोरेशन ही अशी पहिली कंपनी आहे जी भिकाऱ्यांना कंपनीत हिस्सेदारी देणार आहे. कॉर्पोरेशन भिकाऱ्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये आणि तीन वर्षांनंतर एक लाख रुपयांची किमान अर्थसहाय्य देण्यासाठी त्यांच्या सोबत करार करणार आहे. भिकाऱ्यांशी करार केल्याने त्यांना तीन वर्षांत किमान 4.6 लाख रुपये मिळणार आहे.
भिकाऱ्यांना भिक देण्याऐवजी त्यांना येथे आणा आणि एक हजार रुपयांचे बक्षिस मिळवा असे आवाहन बेगर्स कॉर्पोरेशनने लोकांना केले आहे. कॉर्पोरेशनने सरकार आणि प्रशासनाला सर्वेक्षण करुन खऱ्या भिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी केली आहे. बेगर्स कॉर्पोरेशनने अण्णा आणि माला या दोन भिकाऱ्यांचा कायापालट कसा झाला हे सांगितले आहे. आधी भिकेवर गुजराण करणारे हे आता केवळ सन्मानजनक जीवनच जगत नसून आपल्या कुटुंबाचा आधार बनले आहेत.