तिरुवनंतपुरम: सर्पमित्र म्हणून ओळख असलेल्या वावा सुरेश यांच्या आणि समोरुन येणाऱ्या कारचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याने वावा सुरेश गंभीर (Vava Suresh) जखमी झाले आहेत. या अपघातात वावा सुरेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. या आधीही त्यांना कोब्राने (Cobra) दंश केल्याने रुग्णालयात काही दिवस दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आता त्यांचा अपघात झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
तिरुवनंतपुरम कोल्लम जिल्हा सीमा थट्टाथुमाला येथे आज दुपारी हा अपघात झाला. वावा सुरेश हे कारने चेंगन्नूरला जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या कार चालकही गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्पमित्र वावा सुरेश ज्या कारमधून प्रवास करत होते, त्या कारचा अपघात होऊन वावा सुरेश आणि त्यांचा चालकही जखमी झाला आहे. या दोघांसोबत आणखी कोणी होते का त्याचा तपास पोलीस करत आहेत. हा पोथेनकोड जंक्शनजवळ झाला आहे.
तर वावा सुरेश यांची कार आणि समोरुन येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात वावा सुरेश बरोबरच त्याचा चालक तर दुसऱ्या कारमध्ये दोन महिला, एक नऊ दिवसांचे बाळ आणि दोन पुरुषही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात त्यांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या अपघातानंतर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. अपघात झाल्याचे समजताच त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.