पहिल्या शाकाहारी मगरीच्या मृत्यूने हळहळ! अंत्ययात्रा काढत कुठे आणि कुणी दिला भावपूर्ण निरोप?
तांदूळ, गूळ खाऊन 75 वर्ष जगलेल्या मगरीचा केरळमध्ये मृत्यू! तिच्या मृत्यूने अख्ख जग का हळहळलं?
जगभरातील प्राणी प्रेमींच्या काळजाला चटका लावणारी घटना केरळमधून (Keral) समोर आली आहे. एका 75 वर्षांच्या मगरीचं निधन झालं आहे. विशेष म्हणजे ही मगर शाकाहारी (Vegetarian crocodile) होती. एक मंदिराजवळच्या तलावात तिचं वास्तव्य होतं. पण तिने कधीच कोण्या भाविकाला जखमी केलं नाही, असं मंदिराशी संबंधित लोकं सांगतात. चक्क अंत्ययात्रा काढत या शाकाहारी मगरीला (Keral Babiya Crocodile) भावपूर्ण निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे दिवसातून दोन वेळा ही मगर देवदर्शन करण्यासाठी मंदिर परिसरात यायची, असंही सांगण्यात आलंय. ही घटना आहे केरळच्या कारागोड येथील.
केरळ राज्यातील कासरगोड इथं श्री अनंदपद्मनाभ स्वामी मंदिराची रक्षक म्हणून ज्या मगरीकडे पाहिलं जातं, त्या बाबिया नावाच्या मगरीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय. अनंतपुरा गावातील मंदिराच्या तलावात बाबिया मगरीचा मृतदेह आढळला. मागच्या रविवारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
कशामुळे मृत्यू?
गेल्या काही दिवसांपासून बाबिया मगरीची प्रकृती खालावली होती. तिनं खाणंपिणं सोडलं होतं, असं मंदिराचे ट्रस्टी उदय कुमार आर गट्टी यांनी सांगितलं. मंगळुरु येथील पिलुकुला बायोलॉजिकल पार्कातील पशु चिकित्सकांनी या मगरीच्या मृत्यूबाबत तपास सुरु केला आहे, असं सांगितलं जातंय.
Babiya, the “vegetarian crocodile” who resided in the pond of the Śrī Ananta Padmanābha Swāmi Kşētram in Kasargod, Keral & lived on the prasādam offered to her from the Kşētram regularly for 70 years,shed her mortal coil on Śarada Poornimā last night.
ॐ शान्ति pic.twitter.com/C7QK9dvR7b
— S Pratap Sinh Jadaun (@shailen_pratap) October 10, 2022
दिवसातून दोन वेळा बाबिया मगर देवदर्शनसाठी यायची. मंदिर प्रशासनाकडून या मगरीला दिवसातून 2 वेळा प्रसाद दिला जात होता. या प्रसादाचं सेवन ही मगर करत असे. तांदूळ, गूळ खाणारी ही मगर आता जिवंत नसल्यानं अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.
व्हेज मगर
मंदिरात दाखवला जाणारा तांदळाच्या लाडवाचा प्रवास बाबिया मगरीला दिला जात होता. दरम्यान, तिला अनेकदा मांसही खाण्यासाठी दिलं गेलं होतं. पण तिने ते खाल्लं नाही, असं सांगितलं जातं. ना तिने कधी माणसांवर हल्ला आणि नाही तिने कधी तलावातील माशांचं सेवन केलं, असंही मंदिरातील लोकं सांगतात.
बाबिया मगरीला ईश्वरदूत मानलं जात होतं. कधीच कुणावरही हल्ला न करणाऱ्या बाबिया मगरीच्या मृत्यूने जग हळहळलंय. मृत्यूनंतर तिच्यावर परंपरेप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले. यासाठी हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. बाबिया मगरीवर प्रेम करणाऱ्या शेकडो लोकांचे डोळे, तिला निरोप देताना पाणावले होते. अंत्ययात्रा काढून मंदिर परिसरातच या मगरीला दफन करण्यात आलं.