एका लग्नाची दुसरी गोष्ट; पशूवैद्यकीय डॉक्टराला आधी फोन केला; नंतर अपहरण; अन् नंतर डीजे लावून थेट लग्नाची वरातच काढली…
बेगुसराय: बिहारमध्ये (Bihar) कधी काय घडेल सांगता येणार नाही. कधी काळी गुन्हेगारीच्या (Crime) आकडेवारीत वरच्या क्रमांकावर असलेल्या बिहार राज्यात दिवसा फिरतानाही लोकं घाबरत होती असं म्हटलं जातं. आताही एक सोशल मीडियावर बिहारचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक नवरदेव बसलेला दिसतो आहे, तर त्याच्या मागे दिव्यांचा झगमगाट आणि डीजेवर भोजपूरी गाणीही वाजत आहेत. एकदंरीत […]

बेगुसराय: बिहारमध्ये (Bihar) कधी काय घडेल सांगता येणार नाही. कधी काळी गुन्हेगारीच्या (Crime) आकडेवारीत वरच्या क्रमांकावर असलेल्या बिहार राज्यात दिवसा फिरतानाही लोकं घाबरत होती असं म्हटलं जातं. आताही एक सोशल मीडियावर बिहारचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक नवरदेव बसलेला दिसतो आहे, तर त्याच्या मागे दिव्यांचा झगमगाट आणि डीजेवर भोजपूरी गाणीही वाजत आहेत. एकदंरीत सगळा माहोल हा लग्नाचा आहे, मात्र हे लग्न आनंदात साजरं केलं असं दाखवलं असलं तरी ते मनासारखं नाही त मनाविरुद्ध केलेलं लग्न आहे. तेही अगदी पशूवैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या तरुणाचं अपहरण करुन जबरदस्तीनं लग्न (Forced Marriage) करुन देण्यात आले आहे. आणि हाच व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायर होतो आहे.
Bihar | A veterinarian was abducted and forcibly married in Begusarai
“He was called around 12pm to check on a sick animal, after which 3 people kidnapped him. Everyone in the house was worried after which we went to the police.” said a relative of the victim (14.06) pic.twitter.com/OYA1lQWoBi
— ANI (@ANI) June 15, 2022
बिहारमधील बेगुसराय येथे जनांवरावर उपचार करण्यासाठी पशूवैद्यकीय डॉक्टराला बोलवून जबरदस्तीने लग्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
डॉक्टरचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल
या प्रकरणातील जनावरांवर उपचार करणारा पशूवैद्यकीय डॉक्टरला बोलवून अगोदर त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याचे जबरदस्तीने लग्न करण्यात आले. हे प्रकरण बेगुसरायमधील तेघडा पोलीस हद्दीत घडले आहे. अपहरण करुन जबरदस्तीने लग्न करुन दिलेल्या या डॉक्टरचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पशूवैद्यकीय डॉक्टराचे जबरदस्तीने लग्न
ज्या पशूवैद्यकीय डॉक्टराचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले आहे, तो तेगडा तालुक्यातील पिढौली गावातील आहे.आता या याप्रकरणी डॉक्टराच्या वडिलांनी तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, माझा मुलगा सत्यम कुमार झा हा पशूवैद्यकीय डॉक्टर आहे. त्याला विजय सिंह यांचा फोन आला आणि त्यांनी सत्यमला जनावरांवर उपचार करण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर आपल्या मुलाचे अपहरण करुन त्यांनी जबरदस्तीने विजय सिंह यांच्या मुलीबरोबर आपल्या मुलाचे लग्न केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सत्यमने लग्न समारंभातील आनंद
या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विजय सिंह यांच्या घरावर धाड टाकील, मात्र घरात मुलगा आणि मुलगी दोघंही सापडले नाहीत. मात्र त्यांच्या या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये, सत्यमने लग्न समारंभातील नवऱ्याचा पोशाख घातला आहे, आणि त्याच्या सोबतच्या लग्न करणाऱ्या मुलीनेही नवरीचा ड्रेस आणि मेकअप केला आहे. या दोघांच्या मागे लोकांची गर्दी आहे, तर काही लोकांनी डीजेच्या तालावर ठेकाही धरला आहे. मुलीकडील मंडळी हसत खेळत आनंदात नाचत आहेत तर त्याचवेळी सत्यम मात्र खूप घाबरलेला असा दिसत आहे.
जबरदस्तीने लग्न करणं हे बिहारसाठी नवं नाही
बेगुसराय पोलीस अधीक्षक योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, पीडित वडिलांच्या तक्रारीनुसार सगळ्या बाजूने पोलीस तपास करत आहेत. आता सत्यमला बोलवून घेऊन त्याला कोणी बोलवून घेतलं होतं की, त्याची जबरदस्तीने लग्न करुन दिले आहे याची त्याच्याकडे चौकशी केल्यानंतरच या प्रकरणातील सत्य कळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बिहारमध्ये पकडून जबरदस्तीने लग्न करणे हा काही नवीन गुन्हा नाही.
ही प्रथा थांबवण्याचा प्रयत्न
पोलीस अधीक्षक योगेंद्र कुमार यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, बेगुसरायमध्ये 1970 पासून अशा या घटनांची सुरुवात झाली आहे. याप्रकराची लग्न बेगुसरायबरोबरच बिहारमधील काही जिल्ह्यातून अशी प्रकरणं खूप प्रसिद्ध आहेत. परिस्थितीनुसार ही प्रथा थांबवण्याचा प्रयत्न झाला आहे. तरीही काही प्रमाणात अशी प्रकरणं समोर येत आहेत. 2012 मध्येही असेच प्रकरण गया जिल्ह्यात घडले होते, छठ पूजेसाठी घरी आलेल्या एका युवकाचे अपहरण करुन त्याची जबरदस्तीने लग्न करण्यात आले होते.
विवाह बेकायदेशीर
पाटण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने 2019 मध्ये अशाच एका प्रकरणात झालेला विवाह बेकायदेशीर असल्याचे घोषित केले होते. तर 2017 मध्ये, पीडित विनोद हा त्याच्या मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पाटण्याला गेला होता, त्यावेळी त्यालाही मारहाण करून बंदुकीच्या जोरावर जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले होते.