Vice President Election date : राष्ट्रपती पाठोपाठ उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकही जाहीर, 6 ऑगस्ट रोजी मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर लगेच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकही जाहीर झालीय. 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे, तशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय.

Vice President Election date : राष्ट्रपती पाठोपाठ उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकही जाहीर, 6 ऑगस्ट रोजी मतदान
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 4:48 PM

मुंबई : संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरु होत आहे. अशावेळी राष्ट्रपतीपदाची निवडणुकही (Presidential Election) 18 जुलैला होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 21 जुलैला लागणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर लगेच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकही जाहीर झालीय. 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक (Vice Presidential Election) पार पडणार आहे, तशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) राष्ट्रपती निवडणुकीसोबत उपराष्ट्रपती पदाची निवडणूकही पार पडणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.

उपराष्ट्रपती हे राज्यसभेचो पदसिद्ध अध्यक्ष असतात. निवडणुकीवेळी राज्यसभेचे महासचिव हे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर लोकसभेचे महासचिव हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. संसदेतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे.

उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष

देशात 1952 मध्ये पहिल्यांदा उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले. उपराष्ट्रपती म्हणून दोन टर्म त्यांचा कार्यकाळ राहिला. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळही 5 वर्षांसाठी असतो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त होतं.

उपराष्ट्रपतीपदाला अनन्य साधारण महत्व

भारतात उपराष्ट्रपती राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. संविधानामधील 63व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग किंवा अन्य कारणांमुळे राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतात. तसंच संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतींवर आहे.

राष्ट्रपतीपद निवडणूक प्रक्रिया

भारतीय राजपत्रात 15 जून, 2022 प्रकाशित झालेल्या अधिसूचनेद्वारे, राष्ट्रपती निवडणूक, 2022 साठी खालील वेळापत्रक निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे, त्यानुसार

>> 29 जून 2022, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक >> 30 जून 2022, उमेदवारी अर्जांची छाननी >> 2 जुलै 2022, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक >> 18 जुलै 2022, आवश्यक असल्यास मतदान घेतले जाईल

आयोगाने 13 जून, 2012 रोजी आणखी एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांची 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली. तर, विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) मुकुल पांडे आणि राज्यसभा सचिवालयातील मुख्य दक्षता अधिकारी तसेच संयुक्त सचिव सुरेंद्र कुमार त्रिपाठी यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.