Video : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदाराच्या कानाखाली वाजवली! व्हिडीओ व्हायरल

मध्य प्रदेशच्या शहाजापूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एका चप्पल दुकानदाराच्या कानाखाली वाजवल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Video : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदाराच्या कानाखाली वाजवली! व्हिडीओ व्हायरल
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदाराच्या कानशिलात लगावली
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 11:34 PM

भोपाळ : छत्तीसगडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी औषध आणायला जाणाऱ्या एकाला कानशिलात लगावल्याच्या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोच असाच एक प्रकार मध्य प्रदेशात पाहायला मिळालाय. मध्य प्रदेशच्या शहाजापूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एका चप्पल दुकानदाराच्या कानाखाली वाजवल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लॉकडाऊनच्या काळातही दुकान उघडं ठेवल्यामुळे त्या दुकानदाराला मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. मंजुषा विक्रांत राय असं या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे. (Additional Collector beats sandal shopkeeper in  Madhya Pradesh)

लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहाजापूरमधील एका चप्पल विक्रेत्यानं दुकान सुरु ठेवल्याचं मंजुषा राय यांच्या लक्षात आलं. त्यांनी संबंधित दुकानदाराला त्याबाबत चांगलंच खडसावलं. तसंच त्याच्या घराचा पत्ता विचारला. त्यावेळी तो दुकानदार खोटं बोलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा मंजुषा राय यांनी दुकानदाराच्या कानाखाली मारली. तेव्हा अन्य एका पोलिसाने दुकानदाराला दांडक्याचा धाक दाखवला. शेवटी अधिकाऱ्यांनी त्या दुकानदाराला दुकान बंद करण्याची तंबी दिली आणि तिथून निघून गेले.

कलेक्टरनं आधी मोबाईल फोडला नंतर थोबाडीत मारली

छत्तीसगडच्या सुरजापूरचे कलेक्टर रणबीर शर्मा यांनी एका व्यक्तीला विनाकारण केलेली मारहाण सध्या चर्चेचा विषय आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत सूरजापूरचे जिल्हाधिकारी एका व्यक्तीवर दादागिरी करताना दिसत आहेत. या व्यक्ती त्यांच्याकडे गयावया करत असताना त्यांनी प्रथम त्या व्यक्तीला मोबाईल जमिनीवर आटपून फोडला. त्यानंतर या व्यक्तीने जाब विचारला तेव्हा कलेक्टरने या व्यक्तीच्या कानाखाली मारली. एवढेच नव्हे तर आजुबाजूला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याने व्यक्तीला झोडून काढा, असे सांगितले. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. अनेकजण कलेक्टरने गेलेल्या अधिकारांच्या गैरवापराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

कलेक्टरनं लग्नात घुसून वऱ्हाडींची वरात काढली

त्रिपुरातील आगरताळामध्ये नियमांचं उल्लंघन करत होत असलेल्या लग्नात जिल्हाधिकाऱ्यांनी घुसून थेट वर्हाडी मंडळींची वरात काढल्याचं काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. शैलेश यादव असं या जिल्हाधिकारींचं नाव आहे. एकिकडे अनेक रुग्ण आयसीयूत दाखल आहेत, तर दुसरीकडे काही मंगल कार्यालय चालक जिल्हा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने लग्न समारंभ करत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितलं. मात्र, पोलीसही टाळाटाळ करत असल्याचं आणि उडवाउडवीची उत्तर देत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करत होत असलेल्या लग्नांना पोलिसांकडूनही अभय असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे एकूणच नागरिक आणि पोलिसांचं बेजबाबदार वर्तन पाहून जिल्हाधिकारी शैलेश यादव चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या : 

रामदेव बाबांचा पुन्हा एकदा एलोपॅथीवर निशाणा, IMA आणि फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न

लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या थेट नदीत उड्या! हे कुठे घडलं?

Additional Collector beats sandal shopkeeper in  Madhya Pradesh

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.